रफी, किशोर अाणि मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांचा नजराणा

अमित गवळे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पाली(रायगड) : ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात तुम बिन जाऊँ कहाँ…संगीत कार्यक्रमाचे अायोजन म्युजिक सेशन एंन्टरटेंनमें यांनी केले होते. तर पीटीअारएचे के कुमार यांच्या सहयोगाने कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये मूहम्मद रफी, किशोर कुमार अाणि मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांचा नजराणा पेश करण्यात आला. यामध्ये प्रसिद्ध गायक व संगितकार यांनी अापल्या सुरेल अाणि दर्जेदार अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे को स्पाॅंन्सर निपाॅन पेंट हे होते. इव्हेंट डायरेक्टर गणेश घनःश्याम यांनी कार्यक्रमाचे योग्य व प्रभावी नियोजन व संयोजन केले. यावेळी प्रख्यात गायक अनिल बाजपेयी यांनी सुरेल गाणी गाऊन रसिकांची मने जिंकली. संगीत संयोजन मोहित शास्त्री व सहवादकांनी केले. स्वाती चौधरी, संघमित्रा गंगावणे अाणि दिपाली व्होरा या गायिकांनी सुमधूर गाणी सादर केली. मुळ तुम बीन जाऊ कहा गाण्यातील मेंडोलीन वादक किशोर देसाई, सुर नवा ध्यास नाव फेम जितेंद्र तुपे, सिनियर पोलिस इंन्स्पेक्टर विलास गंगावणे यांची कार्यक्रमास विषेश उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.

Web Title: Rafi, Kishor and Mukesh's evergreen songs!