डॉ. कल्पना आठल्ये यांना रघुनाथ पंडित पुरस्कार प्रदान 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

रत्नागिरी - दादर, मुंबईच्या शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेतर्फे रघुनाथ पंडित राष्ट्रीय पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील कला शाखेच्या उपप्राचार्य व संस्कृत विभागप्रमुख डॉ. प्रा. कल्पना आठल्ये यांना प्रदान केला. 

रत्नागिरी - दादर, मुंबईच्या शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेतर्फे रघुनाथ पंडित राष्ट्रीय पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील कला शाखेच्या उपप्राचार्य व संस्कृत विभागप्रमुख डॉ. प्रा. कल्पना आठल्ये यांना प्रदान केला. 

डॉ. आठल्ये या गेली अनेक वर्षे रत्नागिरीमध्ये संस्कृत प्रचाराचे कार्य जोमाने करत आहेत. राष्ट्रीय संस्कृत संस्थान व अन्य संस्थांमार्फत त्या उपक्रम राबवीत आहेत. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला. लेफ्टनंट कर्नल यशवंत देवस्थळी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला. या वेळी शिवाजी ज्ञानपीठाचे संस्थापक डॉ. हेमंतराजे गायकवाड प्रमुख उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी ही संस्था कार्य करते. या उद्देशाने शिवकार्याशी संबधितांना दरवर्षी पुरस्कार देतात. महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर मराठी भाषेवर फारसी, उर्दू, अरब भाषेचे झालेले आक्रमण, सरमिसळ दूर करण्याकरिता रघुनाथ पंडित यांच्याकडून राज्य व्यवहारकोष लिहून घेतला. रघुनाथ पंडित यांनी संस्कृतच्या साह्याने राज्यव्यवहारातील संज्ञा मराठीमध्ये तयार केल्या. छत्रपतींच्या या कार्याचे स्मरण म्हणून हा पुरस्कार प्रदान केला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raghunath Pandit award to Dr Kalpana Athalye