भैरीबुवाच्या चरणी ठेवला रत्नागिरी नगराध्यक्षांनी राजीनामा

राजेश शेळके
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

रत्नागिरी - जनतेतून पाच वर्षासाठी थेट निवडून दिलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी आज अखेर आपला राजीनामा श्री देव भैरीबुवाच्या चरणी ठेवला. पदाचा राजीनामा मंदिरात ठेवण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असेल. परंतु या राजानाम्याने शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांचा राजीनामा पक्ष मंजूर करून पोटनिवडणुकीला सामोरे जाणार की त्यांचा राजीनामा नामंजूर करून मुदतवाढ देणार, याकडे लक्ष लागले आहे. 

रत्नागिरी - जनतेतून पाच वर्षासाठी थेट निवडून दिलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी आज अखेर आपला राजीनामा श्री देव भैरीबुवाच्या चरणी ठेवला. पदाचा राजीनामा मंदिरात ठेवण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असेल. परंतु या राजानाम्याने शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांचा राजीनामा पक्ष मंजूर करून पोटनिवडणुकीला सामोरे जाणार की त्यांचा राजीनामा नामंजूर करून मुदतवाढ देणार, याकडे लक्ष लागले आहे. 

येथील पालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2016 मध्ये झाली. याआधीच्या सेना-भाजप युतीच्या सत्तेवेळी सेनेचा-भाजप यांच्याध्ये पक्षांतर्गत धोरण निश्‍चित करून सव्वा-सव्वा वर्षाच्या काळासाठी नगराध्यक्षपदासाठी वाटून घेतला गेला. सेनेची टर्म झाल्यानंतर भाजपकडे ही संधी गेली. नगराध्यक्ष म्हणून महेंद्र मयेकर यांनी पदभार घेतला. मात्र शब्दांचा खेळ करून पुढील सर्व कार्यकाल महेंद्र मयेकर यांनी भोगला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल पंडित निवडून आले. 

थेट नगराध्यक्ष म्हणून राहुल पंडित 5 वर्षांसाठी निवडून आले. मात्र त्यांची टर्म 5 वर्षे नाही 2 वर्षांचीच आहे, असे शिवसेनेने जाहीर केले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे दावेदार सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी होते. मात्र पूर्वीच्या सत्तेला कंटाळलेल्या जनेतेला सुशिक्षित आणि स्वच्छ चेहरा हवा होता. तेव्हा राहुल पंडित यांचे नाव पुढे आले. जनतेच्या कल लक्षात घेऊन अखेर साळवी यांना थोपविण्यासाठी पक्षांतर्गत तडजोडीचे राजकारण झाले. 2 वर्षांनी राहुल पंडित यांनी राजीमाना द्यायचा अशी शपथ श्री देव भैरी बुवासमोर घेण्यात आली. 

दोन वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी गेल्याने तेव्हाची राजकीय परिस्थिती आणि आताच फार वेगळी आहे. आता राजीनामा पक्षाने मंजूर केला तर नागरिकांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. निवडणुकीसाठी सेनेसह अन्य पक्षांनी तयारी सुरू केली.  

राजीनाम्यामुळे शहरातील नागरिकांची एक फळी राहुल पंडित यांच्या मागे उभी राहू लागली. जनता त्याच्या कारभाराबाबत समाधानी नसली तरी नाराजही नाही. त्यात येत्या चार महिन्यांमध्ये लोकसभा निवडणूका लागण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत तडजोडीसाठी लोकांवर निवडणूक लादली जाणार असल्याने सेनेविरोधात जनमत होऊ लागले. याचा तोटा लोकसभेला होण्याची शक्यता होती. म्हणून राहुल पंडित यांचा राजिनामा न घेता त्यांना रजेवर पाठविण्याचा प्रयत्न झाला. पण राहुल पंडित राजीनाम्यावर ठाम राहिले.

राहुल पंडित यांना रजेवर पाठविण्याचा सेनेचा डाव होता. त्यानंतर उपनगराध्यक्षपद बंड्या साळवी यांच्याकडे देऊन त्यांना 6 महिने प्रभारी नगराध्यक्ष करण्याची खेळी होती. परंतु राहुल पंडित राजीनाम्यावर ठाम राहिल्याने सेना अडचणीत आली आहे. 

Web Title: Rahul Pandit resign issue