चिपळूण तालुक्यातील कामथेत गुटखा कारखान्यावर छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

चिपळूण - तालुक्‍यातील कामथे येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. लाखो रुपयांचा हा गुटखा आहे. यामध्ये 12 ते 15 पोती गुटखा जप्त केला आहे. सायंकाळी सातच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव व पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी ही कारवाई केली.

चिपळूण - तालुक्‍यातील कामथे येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. लाखो रुपयांचा हा गुटखा आहे. यामध्ये 12 ते 15 पोती गुटखा जप्त केला आहे. सायंकाळी सातच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव व पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी ही कारवाई केली.

विशेष म्हणजे कारखान्याकडे येणाऱ्या मार्गावर संबंधित मालकाने सीसीटीव्हीची यंत्रणा बसवली होती. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी ती उद्‌ध्वस्त केली आहे. या घटनेतील बंगल्याचा मालक आणि आरोपी घटनास्थळी मिळालेले नाहीत. अन्न व औषध विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा केल्यानंतर पुढील तपासाला वेग येणार आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कामथे धरणाच्यावरील बाजूस उंच टेकडावर एका बंगल्यात गुटखा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सायंकाळी सातच्या सुमारास डीवायएसपी आणि देवेंद्र पोळ यांनी सापळा रचून सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकला. कामथे धरणाच्यावरील बाजूस हा बंगला आहे.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर बंगल्यात गुटख्याची 12 ते 15 पोती गुटख्याची पोती आढळून आली. या बंगल्यात कोण येते का याची चाचपणी करण्यासाठी सीसीटीव्हीची यंत्रणा संबंधितांनी उभारली होती. कारवाईनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा उखडून टाकली. दरम्यान डीवायएसपी गुरव यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला झाल्या घटनेची माहिती दिली. सायंकाळी सातनंतर या अन्न व औषध विभागाचे पथक घटनास्थळी येण्यास निघाले होते. 

हा बंगला निर्जन ठिकाणी आहे. बंगला टेकडीवर असल्याने कोणालाही याबाबत माहिती नव्हती. बंगला नेहमीच बंद असल्याचे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र बंद बंगल्यात गुटखा कारखाना असल्याचे उघड झाल्याने ग्रामस्थांनाही धक्का बसला आहे. विविध गुटखा कंपन्यांची पाकिटे येथे आणली जायची. कारखान्यात गुटखा तयार करून तो पॅकिंग करून तो वितरित होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

कालुस्तेतील कारवाईशी संबंधाची शक्‍यता 
वर्षभरापूर्वी कालुस्ते येथेही गुटखा कारखान्यावर पोलिसांनी छापे टाकले होते. दोन्ही कारखान्यांची तुलना केल्यास एकच पद्धत असल्याचे उघड होत आहे. कालुस्ते येथील कारखान्याशी कामथेचा संबंध असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on Gatkha factory in Chiplun taluka