खडतर मदतकार्यातही घेतली जात होती मृतदेहांची काळजी

सुनील पाटकर
रविवार, 29 जुलै 2018

पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात काल झालेल्या या भीषण अपघातानंतर येथे होणारे मदतकार्यही खडतर आहे.सर्व प्रथम महाड व पोलादपूर येथून गिर्यारोहक घटनास्थळी दाखल झाले.

महाड : पाचशे फूट खोल दरीतून छिन्नविछिन्न मृतदेह बाहेर काढताना मृतदेहालाही कुठे इजा होऊ नये याची काळजी घेत अहोरात्र काम करणा-या स्थानिक गिर्यारोहकांचे काम कौतुकास्पद व अंगावर काटा उभा करणारे आहे. नजर थांबणार नाही अशी खोल दरी ,दगडी कडे,चिखल,पावसाच्या धारा त्यातच गारठवणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीचे आव्हान स्विकारून गिर्यारोहक आणि एमडिआरएफ चे मदत कार्य अखंड सुरु आहे.आंबेनळी घाटात काल झालेल्या कृषी विद्यापिठाच्या बस अपघातातील 22 मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे.

पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात काल झालेल्या या भीषण अपघातानंतर येथे होणारे मदतकार्यही खडतर आहे.सर्व प्रथम महाड व पोलादपूर येथून गिर्यारोहक घटनास्थळी दाखल झाले. प्रचंड खोल दरीत खालून जाण्यासाठी मार्ग नाही केवळ वरच्या बाजूनेच मदतकार्य सुरु राहणार होते. त्यामुळे केवळ गिर्यारोहक येथून उतरु शकत होते.चिंतन वैष्णव,राहूल वारंगे,योगेश गुरव, प्रशांत भूतकर,अमोल वारंगे,सौरभ शेठ.भैया वडके,सचीन मेहता, रुपेश बुटाला, विलास शिंगवणे, जितेंद्र वाडिले,शैलेश तलाठी असे अनेक जण मदतकार्यात आले.महाबळेश्वर व खेडचे गिर्यारोहकही मदतीला आले. वरुन दोर बांधून खाली उतरण्यात आले,वर क्रेनला दोरी बांधली गेली.तेथून रस्त्या पलिकडे डोंगरातील झाडाला दोरी बांधण्यात आला.क्रेन व खालील भाग यामध्ये तीन टप्पे करुन तेथे काही जण उभे करण्यात आली.

खाली सर्व मृतदेह विखुरले होते त्यांची जमवाजमव करुन एका पोत्यात व त्यानंतर जाळीत घालुन या तीन टप्प्यातून मृतदेह वर पाठवले जात होते. अतिशय ताकदीचे व कष्टाचे हे काम होते परंतु हे काम करताना बॅाडी हळू न्या रे ,काही लागू देऊ नका अशा सुचना येत होत्या .मृतदेहालाही इजा होऊ नये हे मानवचेचे दर्शन येथे दिसत होते. आल्यानतर त्यांना मदत झाली.रात्री सर्चलाईट व हँलोजन वापरुन मदत कार्य सुरुच होते.या सर्वांना सरकारी यंत्रणा.संस्था,दानशूर व्यक्ती यांनी खाणे,पिण्याचे पाणी याची कोणतीच कमतरता भासु दिली नाही.वरुन खाली हे सर्व पाठवले जात होते.आळीपाळीने एकमेकाला सहकार्य करत हे अवघड कार्यही मार्गी लावले जात होते.या आपत्ती काळात सरकारी यंत्रणेचे आपत्ती व्यवस्थापन चोख दिसुन आले.

रँपलिंग, क्लायंबिंग असे अनेक प्रकार आम्ही करतो. परंतु हे क्षण खूप अवघड होते.तरीही अशा आपत्तीच्या काळात मदत करण्याचे आमचे कर्तव्य आहे असे प्रशांत भुतकर यांनी  सांगितले.

Web Title: Raigad Bus accident bus carrying tourists falls into gorge near Ambenali Ghat Poladpur