रंगरूपापेक्षा अभिनयच महत्त्वाचा - अनघा गोडसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

महाड - रंगभूमीवर सादर केली जाणारी कला ही कलाकाराच्या अंगभूत कौशल्याचा आविष्कार असतो. कलाकार हा त्याच्या अभिनयाच्या जोरावरच प्रसिद्धीस पावतो. कलाकारासाठी रंगरूप महत्त्वाचे नसून त्याचा अभिनय महत्त्वाचा आहे, असे मत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनघा गोडसे हिने व्यक्त केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील बोधी कला महोत्सव-२०१८ मध्ये अनघा बोलत होती. ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असल्याचा सार्थ अभिमान मला आहे. कारण या महाविद्यालयानेच माझ्यातील अंगभूत कलाविष्काराला व्यासपीठ मिळवून दिले. खूप वर्षांनंतर परत एकदा आपल्याच माणसांत येण्याची संधी

महाविद्यालयाने दिल्याने मी त्यांची ऋणी आहे’’, असे ती म्हणाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राचार्य धनाजी गुरव यांच्या संकल्पनेतील बोधी कला महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. आमच्या वेळेस जर असे प्राचार्य लाभले असते तर नक्कीच आमचा इतिहास हा वेगळा घडला असता, असेही ती म्हणाली.

पाश्‍चात्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या मातीतील कला प्रकारांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने बोधी कलामहोत्सव भरविण्यात येत असल्याचे प्राचार्य गुरव यांनी सांगितले. या दोन दिवसीय कला महोत्सवामध्ये एकपात्री, काव्यवाचन, लावणी, भावगीते आदी कला प्रकार सादर केले गेले. 

Web Title: Raigad News Anagha Godase comment