'फटाके नको फोडायला, पुस्तके दया आम्हाला...'

अमित गवळे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

फटाके फोडल्यामुळे पर्यावरण दुषित होते. सजिवांच्या आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतात. दिवाळी हा मंगलमय व आनंदाचा क्षण आहे. हा सण आपण विविध चांगली कामे करुन सुद्धा आनंदात साजारा करु शकतो. शालेय जिवनातच जर मुलांना या संदर्भात माहिती मिळाली तर पुढिल पिढी अधिक संवेदनशिल व जागृत होईल. फटाके न फोडता वाचलेल्या पैशातून पुस्तके किंवा शालेयपोयोगी वस्तू घेता येतात. विदयार्थ्यांनी केलेल्या या जनजागृतीमुळे ग्रामस्थांना याचे महत्व चांगल्या प्रकारे पटले आहे.
- कुणाल पवार, शिक्षक, राजिप शाळा पायरीचीवाडी

राजिप शाळा पायरीचीवाडीच्या विदयार्थ्यांची जनजागृती

पाली (रायगड): सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीचीवाडीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक व फटाके मुक्त दिवाळीची जाणीव जागृती करण्यासाठी गुरुवारी (ता. १२) प्रभात फेरी काढली. हा संदेश देण्यासाठी ग्रामस्थांना भेटकार्ड देखील वाटले. फटाक्यांऐवजी पुस्तक द्या असे आवाहन केले.

यावेळी शाळेतल्या शिक्षकांनी व विदयार्थ्यानी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. फटाकेमुक्त दिवाळी बद्दल जाणीव जागृती होण्यासाठी विदयार्थ्यानी गावातून प्रभातफेरी काढली. यावेळी विदयार्थ्यानी मोठया आनंदात व उत्साहात 'फटाके नको फोडायला, पुस्तके दया आम्हाला'..'चला करू या, फटाकेमुक्त दिवाळी साजरी' अशा घोषणा देवून प्रबोधन केले. विदयार्थ्यांनी स्वत: तयार केलेले ग्रिटींग कार्ड पालकांना व ग्रामस्थांना भेट देऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे विनंतीपूर्वक आव्हान केले. अशा प्रकारे प्रबोधन करण्याची कल्पना शाळेचे शिक्षक कुणाल पवार यांना सुचली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता कुडाळी यांनी मोलाची साथ दिली. विदयार्थ्यांनी गावकर्यांना दिवाळीच्या शुभेच्छांसह पर्यावरण पुरक व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. तसेच फटाक्यांऐवजी पालकांनी आपल्या मुलांना पुस्तक देण्याचे विनंत केली.

Web Title: raigad news diwali crackers and pairichiwadi school