सुधागड तालुक्यातील खांडपोली ग्रामपंचायत निवडणूकीचा पेच सुटला

अमित गवळे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पाली (रायगड): निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे सुधागड तालुक्यातील खांडपोली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 3 च्या मतमोजणीत घोळ झाला होता. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत मतमोजणीच्या घोळामुळे विजयी असुनही सरपंचाला पराजित घोषित केले गेले होते. यासंदर्भातपाली सुधागड तहसिलकार्यालयात आज (गुरुवार) फेरमत मोजणीत झाली आणी कृष्णा वाघमारे विजयी झाल्याचे जाहिर होऊन अखेर हा पेच सुटला.

या निकालाविरुध्द साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा सुधागड तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. तर लवकर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा सरपंचपदाचे उमेदवार कृष्णा वाघमारे यांनी दिला होता. पाली सुधागड तहसिलकार्यालयात घेण्यात आलेल्या फेरमत मोजनीत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार निवडणुक निर्णय अधिकारी नंदकुमार माने यांनी खांडपोली ग्रा.पं.च्या प्रभाग क्र.3 मधील (अनुसुचित जमाती )आरक्षणात कृष्णा वाघमारे यांना 315 मते मिळाल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. तर संजना संजय दिवेकर यांना 256 मते मिळाली असून त्यांची ग्रामपंचायत सदस्यपदी वर्णी लागली आहे. हि फेरमतमोजणी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीधर बोधे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले, पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर,नायब तहसिलदार वसंत सांगळे, आदिंसह प्रशासकीय अधिकारी तसेच सबंधीत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थीत होते. हि फेरमतमोजणी पारदर्शक पध्दतीने व शांततामय वातावरणात पार पडली. या निकालावर समाधान व्यक्त करीत शे.का.प नेते व जि.प सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा यांनी समाधान व्यक्त केले. हा लोकशाहीचा विजय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पाली सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, ग.रा. म्हात्रे, दादा कारखानिस, बाळ मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, दिपक पवार, विजय जाधव आदिंसह पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी राष्ट्रवादी व शे.का.प आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: raigad news Khandpoli gram panchayat elections