रायगड प्राधिकरणाच्या रुपाने आलेल्या विकासाच्या संधीचा फायदा घ्या - खासदार संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पाचाडमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने संस्कार केंद्र स्थापन करावे. या केंद्राला खासदार फंडातून एक कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल.

- खासदार संभाजीराजे छत्रपती

रायगड - रायगड विकास प्राधिकरणाच्या रुपाने विकासाची संधी आपल्या सर्वांना मिळाली आहे. राजकारण विरहीत सर्वांनी एकत्र येऊन या संधीचा फायदा घेतला पाहीजे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. तसेच रायगड प्राधिकरणाच्या वतीने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सर्व गावांना पायाभुत सुविधा देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

किल्ले रायगड परिसरातील २१ गावच्या ग्रामस्थांची एकत्रित बैठक मंगळवारी पाचाडमध्ये झाली. यामध्ये ते बोलत होते.

या बैठकीला रायगड विकास प्राधिकरणाचे सदस्य भगवान चिले, राम यादव, पाडुंरंग बलकवडे,  थोरात, फत्तेसिह सांवत, सनी ताठले, माजी आमदार माणिकराव जगताप आदी उपस्थित होते.

पाचाडमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने संस्कार केंद्र स्थापन करावे. या केंद्राला खासदार फंडातून एक कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल.

- खासदार संभाजीराजे छत्रपती

खासदार संभाजीराजे म्हणाले की या गावातील अनेकजण चारितार्थ चालवण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्याच्यासाठी येथेच रोजगार देण्याचा प्रयत्न या प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. स्थानिक गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्राधिकरण नेहमीच घेईल. मंजुर झालेल्या आराखड्यात गरजेनूसार बदल करण्यात येणार आहेत. तसेच सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येवून समन्वय समिती स्थापन करावी, जेणे करुन या समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांना भेडसवणाऱ्या समस्या सोडवण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Raigad News MP Sambhajiraje Chhatrapati comment