जांभुळपाड्यातील चैतन्य वृध्दाश्रमातील दिवाळी झाली चैतन्यमय

अमित गवळे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

सुधागड मनसेतर्फे फराळ व मिठाईचे वाटप, मनमोकळ्या गप्पा

पाली (जिल्हा  रायगड) : सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील चैतन्य वृध्दाश्रमात सुधागड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकतेच फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी आश्रमातील वृध्द दाम्पत्यां सोबत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या जिवनातील सुखदुखाच्या गोष्टी समजुन घेतल्या.

दिवाळी सणात मनसे मार्फत दिलेली गोड भेट कायम स्मरणात राहिल असे येथील वृध्दांनी सांगितले. या बरोबरच आम्हाला राज ठाकरे साहेबांना भेटायचे आहे अशी इच्छा ही व्यक्त केली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या प्रेमाने भारावून गेलेल्या वृध्दमंडळीच्या चेहर्‍यावरील निखळ आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी उपस्थितांना दिपावळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सचिन अधिकारी म्हणाले की दिवाळी हा सर्वात मोठा व आनंदाचा सण आहे. दिवाळीत चैतन्य वृध्दाश्रमातील माता पित्या समान वडिलधार्‍या मंडळींना भेटून एक आगळे वेगळे समाधान लाभले. 

ही भेट आपुलकी, जिव्हाळा व आपलेपण जपणारी भेट ठरली.वृध्दाश्रमातील वृध्द दांम्पत्यांनी दिलेले आशिर्वाद लाखमोलाचे असल्याचे अधिकारी म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा नेते जे.पी. पाटील, युवा नेते मनसे सचिन अधिकारी, मनसे विद्यार्थी सेना सुधागड तालुका अध्यक्ष सचिन झुंजारराव, मनसे उपतालुकाध्यक्ष सुनिल साठे, मनसे विद्यार्थी सेना उप तालुकाध्यक्ष अजय अधिकारी, उदय सावंत, अजय लखिमळे, श्रीकांत मनवी,प्रसाद काळभोर, राकेश काळभोर आदिंसह कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधागड तालुका मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: raigad news pali old age home diwali celbration mns