देव अाला देव.., मुंग्यांच्या वारुळाचे अादिवासींकडून संवर्धन

अमित गवळे
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

अादिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे. निसर्गातील विविध घटकांना उदा. झाडे, प्राणी अादिंना ते देव मानतात. त्यांच्या विविध श्रद्धा, प्रथा व परंपरा निसर्गाशी निगडीतच आहेत. त्यांचा उदर्निवाह सुद्धा निसर्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यात त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे. सापांबद्दल काही गैरसमज अाहे. यावर अंनिस मागील अनेक वर्षांपासून सर्व विज्ञान व जागृती कार्यक्रमाद्वारे प्रबोधन करत आहे.
मोहन भोईर, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस

पाली (जिल्हा रायगड) : निसर्गावर अवलंबून अादिवासी बांधव जंगलाचा राजा म्हणून समजले जातात. त्यांच्या अनेक श्रद्धा, धारणा व परंपरा निसर्गातील समृद्धीचे जतन व जोपासना करण्यासाठी फलदायीच ठरतात. पाली रवाळजे मार्गावर सुधागड तालुक्यातील अातोणे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला मुंग्यांचे मोठे वारुळ तयार झाले आहे. तेथे देव अाला अाहे या श्रद्धेने व समजापोटी अादिवासी बांधवांनी वारुळाच्या बाजूचा परिसर साफ करून तेथे कुंपण घालून त्याचे संरक्षण केले आहे.

यामार्गावर रवाळजे गावाकडे जात असतांना अातोणे गावाच्या अलिकडे रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्या खाली ही मोठी वारुळे अाहे. हा संपुर्ण भाग जंगलमय आहे. दोन तीन दिवसांपूर्वी येथे काही अादिवासी बांधव गर्दी करुन उभे असलेले पहिले. त्यांना काय झाले? विचारले असता त्यांनी सांगितले की "देव अाला आहे"बाजूला पहिले असता तेथे मुंग्याची भली मोठी वारुळे होती. त्याच्या शेजारी अगरबत्ती, माचिस अाणि वाटी ठेवले होते. त्या ठिकाणी बाजूची झाडे झुडपे साफ केली होती. अाणि कुंपणसुद्धा घातले होते. काल पर्यंत इथे काही नव्हते अात्ता हे वारुळ येथे अचानक अाल्याने अाम्ही पाहत अाहोत, असे एेका अादिवासी बांधवाने सांगितले.

त्यांनी सांगितले की हे अचानक अालेलं नाही, ही प्रक्रिया अगोदर पासून सुरू असते. तेव्हा त्याकडे आपले लक्ष जात नाही. परंतु जेव्हा ते मोठे होते तेव्हा अापले लक्ष वेधते. आपल्याला वाटते अचानक अाले आहे. याची काही भिती नसते. अापल्या घराप्रमाणेच हे देखिल मुंग्याचे घर असते. अाणि मुंग्या असतांना येथे साप राहत नाही. त्यावर अादिवासी बांधवांनी देखिल सांगितले की अाम्हाला याची भिती वाटत नाही. जनावरांच्या पायाने हे वारुळ तुटू नये अाणि इतर माणसे किंवा मुले तेथे जाऊ नयेत यासाठी अाम्ही कुंपण घातले आहे. काहींना तेथे साप येतो असे वाटल्याने सापाच्या पुजेसाठी अगरबत्ती, माचिस व दुधाची वाटी ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. कारण काही असो अापल्या श्रद्धा, परंपरा व भाबड्या समजूतीपोटी पर्यावरणातील प्रत्येक घटक सुरक्षित रहावा हा या मागील उद्देश असावा… परंतु त्या दिवसानंतर तेथे कोणी उभे असलेले दिसले नाही. अाणि वारुळाला सुद्धा काही त्रास नव्हता.

Web Title: raigad news pali varul ant hill worshipped as god's presence