खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट, उर्मट भाषा

raigad
raigad

पाली : महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे कर्मचारी सोमवारी (ता.१६) मध्यरात्रीपासून संपावर गेले अाहेत. त्यामुळे खाजगी वाहतुकदारांनी मात्र प्रवाश्यांची लुट चालविली आहे. एैन दिवाळीत हा संप पुकारल्याने चौपट व पाचपट भाडे देवून प्रवाशी व चाकरमान्यांचे दिवाळे निघाले आहे. तसेच काही खाजगी वाहनचालक प्रवाश्यांसोबत उर्मट वागत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येक जण अापल्या घरी निघाले होते.तर काही जण सुट्टी निमित्त फिरण्यासाठी बाहेर पडले होते. परंतू परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेल्याने या प्रवाश्यांची व चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. खाजगी वाहनचालक या संधीचा फायदा उठवून अडलेल्या प्रवाश्यांकडून चौपट व पाचपट भाडे अाकरत होते. ज्यांनी या भाड्याबद्दल बोलून दाखविले किंवा भाडे थोडे कमी करा असे सांगितले त्यांना काही वाहनचालकांनी बसायचे असेल तर बसा अन्यथा खाली उतरा अशी उर्मठ भाषा वापरली.हतबल झालेले प्रवाशी नाईलाजास्तव पदरमोड करुन चढे भाडे देवून इच्छित स्थळी जात होते. काही प्रवाशी ट्रक, टेम्पोचा देखिल अाधार घेत होते. मुंबई गोवा महार्गावर दिवसभर खाजगी गाडया व अवजड अाणि मालवाहू वाहनेच दिसत होती. प्रवाशी मात्र थांब्यांवर उभे राहुन मोठ्या अाशेने मिळेल त्या गाडीला हात दाखवत होते.

कुठेही उतरा भाडे सारखेच
खाजगी गाडीत बसल्यावर मधल्या कुठल्याही थांब्यावर तरायचे असेल तर शेवटच्या थांब्याचेच पैसे द्यावे लागत होते. पनवेल ते माणगाव भाडे तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक रुपये अाकरले जात होते. समजा पनवेलवरुन बसलेल्या प्रवाश्याला वाकण फाट्यावर उतरायचे असेल तर त्या प्रवाश्याला माणगावचेच भाडे म्हणजे तिनशे रुपये द्यावे लागत होते. या सर्व खटाटोपात सामान्य प्रवाशी मात्र चांगलाच भरडला गेला.

लोकल गाड्यांचे भाडे देखिल अचानक वाढले
काही ठिकाणी लोकल धावणार्या खाजगी गाडया, रिक्षा, मिनिडोअर किंवा विक्रम रिक्षा यांनी अापले भाडे अचानक वाढविले होते.एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी समजा दहा रुपये घेत असतील तर अाता तीथे पंधरा रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे खेड्या पाड्यातील प्रवाशी सुद्धा खुप हैराण झाले अाहेत.

नातेवाईकांना सोडण्यासाठी अालो होतो. खाजगी वाहन चालक खूप भाडे आकारत आहेत. अनेक प्रवाशी भाडे एैकूण मागे फिरत होते.सर्वसामान्य जनतेचे खुपच हाल झाले आहेत. सर्व बाजुने त्यांचे शोषण होत आहे
- रत्नदिप वाघपंजे, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com