रायगड रोपवे 25 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत बंद

ROP-WAY.jpg
ROP-WAY.jpg

महाड : रायगड किल्ल्यावर कमी वेळात जाण्यासाठी उपयुक्त असलेला रायगड रोपवे उद्या 25 फेब्रुवारी पासुन 1 मार्च पर्यंत 5 दिवसांसाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीकरीता बंद ठेवण्यात येणार आहे.

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचा दिड हजार पायऱ्या चढाव्या लागतात. रायगडावर पायऱ्यांनी चालत चालत जातांना अनेकाची दमछाक होते. यामुळे वृद्ध व शारिरिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना गड चढणे खूप अवघड जाते. यावर उपाय म्हणून रायगड रोपवेची सोय करण्यात आली आहे. आता बहुतेक सर्व याचा वापर करतात.

केवळ चार मिनिटात गडाच्या पायथ्यापासून पर्यटकांना गडावर नेणारा रोपवे आता पाच दिवस बंद राहणार आहे. रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची अचानक गैरसोय होऊ नये म्हणून पर्यटकांच्या सोयीसाठी रोपवे प्रशासनाकडून हे कळवण्यात आले आहे. तसेच नातखिंड या ठिकाणी या बाबत फलकही लावण्यात आलेले नाहीत. या काळात रायगडावर येणाऱ्यांना पायी जाता येईल, परंतु रोपवे सुविधा मिळू शकणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com