शिवस्मारकासाठी रायगडावरील माती, जल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

महाड - मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन शनिवारी (ता.२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे रायगड किल्ल्यावरील माती आणि गडावरील गंगासागर तलावाचे पाणी मुंबईत नेण्यात येत आहे. 

बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी ते जमा करण्यात आले. या वेळी आमदार भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. यानंतर पाचाड येथे झालेल्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी, थोर पुरुषांची स्मारके जगाला प्रेरणा देणारी असतात. हे स्मारकही जागतिक दर्जाचे स्मृतिस्थळ आणि पर्यटनस्थळ ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. या स्मारकासाठी आवश्‍यक असलेल्या चौदा परवानग्या मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करून मिळविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर माती आणि जलकलश घेऊन रथ मार्गस्थ झाला. लाडवली, महाड शिवाजी चौक या ठिकाणी कलशाचे पूजन आले. महाडमधील नद्या आणि गडकिल्यांवरील माती आणि पाण्याचे कलश स्थानिकांनी चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. येथील कलश महाड येथील शिवाजी चौकात आणण्यात आले. ते एकत्रित करून स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत नेण्यात आले.

Web Title: Raigad soil, water for Shiva monument