रायगडच्या समुद्र किनाऱ्याला उधाणाचा तडाखा

महेंद्र दूसार 
रविवार, 15 जुलै 2018

अलिबाग : वादळी पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणाचा तडाखा रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीला बसला असून सुरूची झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली. उधाणाचा प्रभाव 17 जुलैपर्यंत कायम राहणार असल्याने समुद्रा लगत राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

रविवारी दुपारी 12.30 वाजता सुरू झालेल्या भरतीच्या दरम्यान साधारण 4.45 मीटर उंचीच्या या लाटा किनारपट्टीवर आदळू लागल्या. अलिबाग, वरसोली, साखर-आक्षी, मुरुड तालुक्यातील एकदरा, खोराबंदर, आगरदांडा, श्रीवर्धन मधील दिवेआगर समुद्र किनाऱ्यावरील नागरी भागाला लाटांचा तडाखा बसला. अलिबाग तालुक्यातील भाहिरीचापाडा, माणकुळे, गणेशपट्टी या गावांमध्ये उधाणाचे पाणी शिरले आहे.

उधाणाची कल्पना किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांना आगाऊ देण्यात आली होती. यामुळे मच्छीमारानी आपल्या नौका सुरक्षित ठेवल्या आहेत. मात्र, या उधाणामुळे किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून वादळी वाऱ्यामुळे काशीद समुद्र किनाऱ्यावरील सुरूची झाडे मोठ्याप्रमाणात उन्मळून पडली आहेत. मुरुड समुद्र किनाऱ्यावरही या  लाटांचा उत्पात दिसून आला. लाटांचा जोर दुपारी 2 वाजेपर्यंत कायम होता.

Web Title: Raigad's sea shore rises