शिवसेना माजी रायगड जिल्हा प्रमुखांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

अमित गवळे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पाली (रायगड): शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले आहेत. गुरुवारी (ता. 29) रात्री जेष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या पालीतील कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार सुनिल तटकरे यांनी प्रकाश देसाई हे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले असल्याचे जाहीर केले.

पाली (रायगड): शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले आहेत. गुरुवारी (ता. 29) रात्री जेष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या पालीतील कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार सुनिल तटकरे यांनी प्रकाश देसाई हे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले असल्याचे जाहीर केले.

प्रकाश देसाई यांनी दोन महिण्यापुर्वी आपल्या जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतर प्रकाश देसाई कोणत्या राजकीय पक्षात दाखल होणार की शिवसेनेतच राहणार याची सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सर्वसामान्य जनतेला उत्सुकता लागली होती. मागील अनेक दिवसांपासून सुनिल तटकरे यांनी देसाईंनी आपल्या पदाधिकार्‍यांसह राष्ट्रवादीत दाखल होण्याकरीता प्रयत्न केले होते. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रोह्यात 5 डिसेंबर रोजी होणार्‍या संविधान बचाओ, देश बचाओ या कार्यक्रमात देसाईंचा जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले. देसाई यांच्या संघटनकौशल्यांचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी केला जाईल असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत तटकरे म्हणाले की, सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील मागील अनेक वर्षांपासून आग्रही राहिला आहे. ओबींसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळतेय ही बाब अत्यंत आनंदाची आहे. येत्या काळात पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याची ग्वाही देसाई यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, सभापती साक्षी दिघे, जिल्हा उपाध्यक्ष ग.रा.म्हात्रे, प्रकाश कारखानिस, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे मुख्य संघटक अनुपम कुलकर्णी, बाळ  मराठे, सुधागड तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष रमेश साळुंके, माजी अध्यक्ष यशवंत पालवे, पाली शहर अध्यक्ष अभिजीत चांदोरकर, अविनाश शिंदे व वेत्रवान गुरव आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Web Title: raighad prakash desai join ncp