रत्नागिरी स्थानकावर प्रवाशांचा रेल रोको

राजेश कळंबटे
रविवार, 6 मे 2018

गाडी रद्दची माहिती नसल्याने हा गोंधळ झाला. 2 गाड्यामधून प्रवाशी पाठवण्यात आले  असून त्या गाड्या रत्नागिरी ते मडगाव दरम्यान सर्व स्थानकावर थाबावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- उपेंद्र शेंडये, विभागीय व्यस्थापक, रत्नागिरी

रत्नागिरी : दादर रत्नागिरी मडगाव हि पेसेंजर गाडी ब्लॉक घेतल्यामुळे अचानक रत्नागिरीपर्यंत चालावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मडगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला. संतप्त प्रवाशांनी रत्नागिरी रेल स्थानकात मालगाडी रोखून धरली. त्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या खोळंबल्या होत्या.

दादारहून सुटणार पेसेंजर नियमित पाने दादर ते मडगाव अशी सोडली जाते. परंतु मांडवी ब्रिज चे काम सुरु असल्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती 2 दिवसांपूर्वी कोंकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र काल दादर स्टेशनवरून पेसंजर गाडीची तिकिटे मडगावपर्यंतची देण्यात आली. रत्नागिरीतुन गाडी पुढे रद्द झाल्याची माहिती नसलेले सुमारे पाचशेहून अधिक प्रवासी या गाडीतून लरवास करीत होते. रात्री 1 वाजता गाडी रत्नागिरीत आल्यावर ती पुढे मडगावला जाणार नाही असं समजल्यावर प्रवाही संतापले. त्यांनी स्टेशन मास्टरकडे हि बाब सांगितली मात्र त्यांनी प्रवाशांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. संतापलेल्या सर्व प्रवाशांनी स्थानकावरील गोव्याकडे जाणाऱ्या मालगडीपुढे रेल रोको सुरु केला. शेकडो प्रवाशी रुळावर उतरल्यामुळे रेल प्रशासनाचे धाबे दणाणले होते. रेल पोलिसांनी स्थानिक पोलिसांना पाचारण केले. कोंकण रेल्वेचे विभागीय व्यस्थापक उपेंद्र शेंडे आणि अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. तबल तीन तास हा प्रकार सुरु होता. पर्यायी व्यवस्थ करेपर्यंत आम्ही रुळावरुन बाजूला होणार नाही असा पवित्र प्रवाशांनी घेतला होता.

रेल रोकोमुळे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या चिपळूण, संगमेश्वर स्थानकावर थांबवून ठेवल्या होत्या. सुट्टीसाठी हजारो चाकरमानी कोंकणात येत असल्याने त्याची पंचाईत झाली होती. अखेर ओखा एक्सप्रेस सह मंडगावकडे जाणाऱ्या गाडीतून त्या प्रवाशांना सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्या नंतर रेल रोको स्थगित करण्यात आला. कोंकण कन्या एक्सप्रेस सह सर्व गाड्या 1 तास उशिराने सोडल्या जात होत्या. 
रद्द गाडीची तिकिटे देऊन दादर स्टेशनला प्रवाशांची पहिली झोप उदावणाऱ्या रेल प्रशासनाकडून रत्नागिरीत कोंकण रेल प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही. रेल रोको करेपर्यंत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा गोंधळ झाल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. 

गाडी रद्दची माहिती नसल्याने हा गोंधळ झाला. 2 गाड्यामधून प्रवाशी पाठवण्यात आले  असून त्या गाड्या रत्नागिरी ते मडगाव दरम्यान सर्व स्थानकावर थाबावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- उपेंद्र शेंडये, विभागीय व्यस्थापक, रत्नागिरी

Web Title: rail roko agitation on Ratnagiri railway station