रसायनीत सार्वजनिक बांधकाम विभागाची अनास्था चव्हाट्यावर

लक्ष्मण डूबे 
सोमवार, 18 जून 2018

पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात पेण, उरण वरून चावणे मार्गे येणारी सरांसरी उंचीचे मालानी भरलेली वाहन सारसईतील या रेल्वे पुलाखालून जाऊ शकत नाही.

रसायनी (रायगड) - आपटा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सारसईततून पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात येताना रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या वाहनांसाठी पुरेशी उंची ठेवली गेली नाही. त्यामुळे वाहन कमानीला अडकून अनेकदा कमानी कोसळून अपघात झाले आहे. वाहन चालक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. 

पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात पेण, उरण वरून चावणे मार्गे येणारी सरासरी उंचीचे मालानी भरलेली वाहन सारसईतील या रेल्वे पुलाखालून जाऊ शकत नाही. वाहन जाताना पुलाला धोका होऊ नये म्हणुन सुरक्षेतचा उपाय म्हणुन सुरवातीला बांधण्यात आलेल्या कमानीला वाहन अडकून कमानी अनेकदा कोसळून अपघात झाले आहे. या रस्त्याचे बांधकाम करताना पुलाखाली सरासरी उंची ठेवण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. जाताना कमानीला वाहन अडकून अपघात होतात. तर टाळ्यासाठी वाहन घेऊन जाताना आपटा मार्गे वळसा घालून जावा लागत आहे. साधारण 4 किलोमीटर आंतर वाढते असे वाहन चालकांकडुन सांगण्यात आले आहे. या ठिकाणी रेल्वे पुलाखाली रस्ता खोलगट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

हा रस्ता बांधण्यात आला त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष्य दिले नाही असे वाटते. परीसरात वाढते औद्योगिकरण आणि गावांचे शहरीकरण होऊ लागले आहे.  त्यामुळे या रस्त्यावरून दळणवळन वाढणार आहे. सर्वच वाहन येथुन जातील अशी उपाय योजना करावी. 
- मारूती पाटील, ग्रामस्थ, चावणे

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The railway bridge is not built properly in rasayani