दिलासादायक ! सिंधुदुर्गातून कामगारांना घेऊन रेल्वे रवाना 

Railway Carries Workers From Sindhudurg
Railway Carries Workers From Sindhudurg

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - विजापूरमधील कामगारांना घेऊन आज रात्री कोकण रेल्वेची विशेष गाडी रवाना झाली. जिल्ह्यात अडकलेले 1440 कामगार स्वगृही जाण्यासाठी निघाले. लॉकडाऊनच्या काळात कोकणात अडकलेले परराज्यातील कामगार आज कोकण रेल्वेच्या माध्यमातुन त्याच्या राज्यात रवाना झाले.

सायंकाळी ही विशेष गाडी रत्नागिरीतून कामगारांना घेऊन येथील सिंधुदुर्गनगरी स्थानकात दाखल झाली. ही गाडी रत्नगिरी - कोडरमा (झारखंड) या मार्गावर धावणार आहे. रात्री ती येथील सिंधुदुर्गनगरी स्थानकात पोहोचली. यात जिल्ह्यात अडकलेले 1440 कामगार आपल्या मूळ गावी रवाना झाले. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत रत्नगिरी - सिंधुदुर्गातील कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा प्रशासनाने चोखपणे जवाबदारी पार पाडली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com