कोकणात पावसाचा जोर कायम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

सिंधुदुर्गात पावसाची मुसळधार सुरूच आहे. जिल्ह्यात अनेक भागांत पाणी घुसल्याने वाहतूक विस्कळित झाल्याचे प्रकार घडले. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, पडझडसत्रही सुरू झाले आहे. काही भागांत कमी उंचीच्या पुुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित झाली.

सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्गात पावसाची मुसळधार सुरूच आहे. जिल्ह्यात अनेक भागांत पाणी घुसल्याने वाहतूक विस्कळित झाल्याचे प्रकार घडले. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, पडझडसत्रही सुरू झाले आहे. काही भागांत कमी उंचीच्या पुुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित झाली.

सरमळे-शितपवाडी येथे दरड कोसळून मार्ग बंद झाल्याचा प्रकार घडला. जिल्ह्याच्या काही भागांत झाडे पडून पडझड सत्र सुरू झाले. दूरध्वनी व वीजव्यवस्था कोलमडल्याची स्थिती आहे. नव्याने सुरू असलेला महामार्ग चौपदरीकरणामुळे रस्ता खचल्याचे व पाणी आजूबाजूच्या घरात घुसल्याचे प्रकार आजही सुरू होते. 

मार्गावर दरड कोसळली 

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. जोरदार पावसामुळे खेड-तिसंगी येथील मंदिराची संरक्षण भिंत, तसेच तळे-दहिवली मार्गावर दरड कोसळली. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. धरणातील पाणीसाठा वाढला असून, शीळसह काही धरणे फुल्ल झाली आहेत. जगबुडी नदीवरील नवीन पुलाला जोडणारा रस्ता खचला आहे.

पिंपळी (ता. चिपळूण) येथे दुकाने आणि घरात पाणी शिरले. जिल्ह्यात आज 1012.00 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सरासरी 112.44 एवढा पाऊस झाला. राजापूर तालुक्‍यात सर्वांत जास्त 192 मि.मी. पाऊस पडला. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरच्या नवीन पुलाचा जोड रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जगबुडी नदीवरील जुन्या पुलाशेजारी हा पूल बांधण्यात आला होता. काही दिवसांत तो वाहतुकीस खुला होणार होता; पण त्यापूर्वीच हा जोड रस्ता खचला आहे. पुलाच्या संरक्षण भिंतीलादेखील तडे गेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Continuous in Kokan