सिंधुदुर्गात संततधार कायम; 24 तासांत 105 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात सोमवारी अतिमुसळधार पाऊसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते
सिंधुदुर्गात संततधार कायम; 24 तासांत 105 मिमी पावसाची नोंद

ओरोस : जिल्ह्यात (sindhudurg district)आज सुद्धा संततधारा सुरुच होत्या. मात्र सोमवारप्रमाणे अतिमुसळधार पाऊस (heavy rain) बरसला नाही. दरम्यान, मालवण तालुक्यातील वायंगणी बौद्धवाडी येथे संरक्षक भिंत कोसळून एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काल दिवस रात्र पडलेल्या पावसाची १०५ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी अतिमुसळधार पाऊस झाला होता. यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यातील अनेक वस्ती, बाजारपेठेत पाणी घुसले होते. सोमवारी रात्री मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठेत पाणी घुसल्याने तारांबळ उडाली होती. तसेच झाडे उन्मळून घरांवर पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले होते. दरम्यान, १९ जून पर्यंत अतिवृष्टिचा इशारा असल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, आज पावसाने काही प्रमाणात उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, झालेल्या पर्जन्य वृष्टीने नुकसानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात घेण्याचे काम सुरु आहे.

सिंधुदुर्गात संततधार कायम; 24 तासांत 105 मिमी पावसाची नोंद
दैव बलवत्तर! आंबोली दरीत उडी घेतलेली विवाहिता बचावली

यात मालवण तालुक्यातील वायंगवडे येथे गटार योजनेची भिंत कोसळली आहे. तर वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथे विद्युत वाहिनीवर चिंचेचे झाड कोसळले त्यामुळे ३-४ विद्युत पोल कोसळले आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १०५ पूर्णांक ३७ मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ४८७.१५मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस व कंसात मिलीमीटरमध्ये असा ः दोडामार्ग - १३२(५२२), सावंतवाडी - ९९(५९६.३), वेंगुर्ला - १३४ (३८४), कुडाळ - १२९(४१५), मालवण - १३२(५०३), कणकवली - ७०(५५०), देवगड - ८९(४७३), वैभववाडी - ५८(४५४), असा पाऊस झाला आहे.

सिंधुदुर्गात संततधार कायम; 24 तासांत 105 मिमी पावसाची नोंद
संकेश्वरात बनली 5 तासांच्या चार्जिंगवर धावणारी इको फ्रेंडली मोटार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com