पावसाळ्यापूर्वी शेतीसह इतर कामांची लगबग सुरू

अमित गवळे
शनिवार, 2 जून 2018

पाली (रायगड) : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. खरिपाचा हंगाम सुरु झाला असल्याने बळीराजा शेतीच्या कामात व्यग्र झाला आहे. त्याबरोबरच मातीचे भराव व खोदकाम, नालेसफाई, बांधकाम व रस्ते निर्मिती अादी कामे सुद्धा पूर्णत्वास नेण्याची अनेकांची लगबग सुरु आहे. परिणामी हि सर्व कामे जलद व योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन व रोडरोल, डंपर अादी अधूनिक यंत्रसामग्री व साधनांना खूप मागणी वाढली अाहे. मात्र डिझेल व पेट्रोलचे दर वाढल्याने या साधने व यंत्रांच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे.

पावसाळा जवळ अाल्याने अनेक जण, शेतकरी तसेच खाजगी विकसक आपल्या जमीनीवर भराव टाकणे, रस्ता करणे, चर खोदणे, डोंगर/दगड फोडणे, वृक्षलागवडीसाठी जागा तयार करणे अशी कामे करतात. तसेच सरकार कडुन विवीध रस्ते बांधनी, नालेसफाई, विहीरी बांधणे, बंधारे घालणे, नवीन गटारे बांधणे अादी कामे सुरु आहेत. या सर्व कामांसाठी मजुरांबरोबरच विविध आधुनिक साधने आवश्यक असतात त्यामध्ये जेसीबी, पोकलन, रोडरोलर, डंपर, ट्रॅक्टर, डंपर, ब्रेकर यांचा समावेश आहे. ही किंमती आणि मोठी साधने सर्वच ठेकेदार किंवा सर्वसामान्य माणसे विकत घेवु शकत नाहीत. त्यामुळे ती भाड्यानेच घ्यावी लागतात.

परिणामी या सर्व यंत्र मालकांकडे सध्या खूप कामे अाहेत. मागणी पेक्षा पुरवठा कमी या अर्थशास्त्रीय नियमानुसार मागणी खुप जास्त असल्याने सध्या या यंत्रसामग्रीचा पुरवठा कमी होत अाहे. कामे अधिक व मागणी जास्त असल्याने अनेक अाॅपरेटर व मालकांना दिलेल्या वेळेत कामावर पोहोचता येत नाही. काही जण तर फोन सुद्धा उचलत नाहीत. अशा काही गमती जमती सुद्धा होत आहेत.

डिझेल व पेट्रोलच्या भाववाढीचा फटका डिझेल व पेट्रोलच्या भाववाढीमुळे अापोअापच ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, ट्रेलर, डंपर अादी सामग्री व वाहनांचे भाडेही वाढले आहे. यंदाच्या वर्षी भाड्यात साधारण वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे. तरी देखिल या सामग्रीची मागणी वाढली असल्याने हा व्यवसाय करणार्‍यांचा धंदा मात्र सध्या तेजित आहे.

Web Title: before rain other works will start