कणकवली, कसाल परिसरात जोराचा पाऊस

तुषार सावंत
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फुलोऱ्यावर आलेल्या काजू आणि आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात गैरमोसमी पावसाने हजेरी लावली होती. दक्षिणेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर दोन-चार दिवस होता.

गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पण आज पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस कोसळला. ढगाळ वातावरण, पहाटेची थंडी आणि अचानक आलेला पाऊस हे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांना धोक्याची घंटा आहे. हाता तोंडाशी येणारा आंबा काजू फुलोऱ्यावर येत असतानाच नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीवर ही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

खरीपातील भाताची कापणी करून जागोजागी गवत रचून ठेवले आहे मात्र अधून मधून पाऊस हजेरी लावत असल्याने या नैसर्गिक संकटाचा फटका गरीब शेतकऱ्याच्या पदरात पडणार आहे. आंबा-काजू बागायतदारांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.

दरम्यान आजच्या पावसामुळे सगळे रस्ते चिखलमय झाले. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली होती मात्र आज दुपारनंतर तापमानात वाढ झाली. सायंकाळी चारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी अचानक कोसळल्याने सगळ्यांची धांदल उडाली. दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने पाऊस पुढे सरकत होता. पावसाची रिप रिप बराच काळ सुरू होती.

Web Title: Rains in Kasal, Kankavali region