आगामी निवडणुका स्वबळावर लढणार : राज ठाकरे

अमोल टेंबकर
मंगळवार, 22 मे 2018

सावंतवाडी : आगामी काळात येणार्‍या निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. त्यादृष्टीने तयारीला लागा दोन महिन्यात जिल्ह्याची कार्यकारीणी तयार करा आणि जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे कार्यकर्त्याना सांगितले.

राज ठाकरे आजपासून जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांनी येथील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन आपल्या कार्यकर्त्याची संवाद साधला. यावेळी सरचिटणीस परशुराम उपरकर शिरीष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, येणार्‍या काळात होणार्‍या विधानसभा लोकसभा निवडणुका आम्हाला मनसे म्हणून स्वबळावर लढायच्या आहेत त्या दृष्टीने पक्षाची बांधणी करणे गरजेचे आहे त्यामुळे जिल्हयापासून बुथपर्यत रिक्त असलेल्या कार्यकारिणी तात्काळ नेमण्यात याव्यात. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सोशल नेटवर्क वापरा असे आवाहन त्यांनी केले

ते पुढे म्हणाले पैशाने निवडणुका लढल्या जात नाही. त्याचमुळे विजय मिळतो असे ही नाही त्यामुळे येणार्‍या काळात सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक तो प्रयत्न करा आणी लोकात पोहोचा असे आवाहन त्यांनी यावेळी केले

यावेळी जिल्हाध्यक्ष धिरज परब,राजन दाभोलकर,चैताली भेंडे,श्रेया देसाई दत्ताराम गावकर,संदिप खानविलकर अभिमन्यू गावडे,सुधीर राउळ,गुरूदास गवंडे,आशिष सुभेदार,मायकल लोबो,शशिकांत आईर,विनायक सावंत,नरेश देवूलकर,आनंद मयेकर,प्रमोद तावडे,ओकार कुडतरकर विजय सावंत,परशुराम परब,आबा चिपकर,धनंजय शिरोडकर,राजा सावंत,आशिष जोशी आदी उपस्थित होते 

भाजप सारखे सोशल नेटवर्क वापरा 

यावेळी उपस्थित कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजपाचा दाखला दिला. ते म्हणाले लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात सोशल नेटवर्कचा वापर करण्यात आला. तसाच वापर तुमच्याकडून होणे अपेक्षित आहे.

Web Title: Raj Thackeray will fight next elections