esakal | वीज बिलांबाबत तेलींचा संताप, आरोग्य यंत्रणेच्याही मुद्द्यावर बोट
sakal

बोलून बातमी शोधा

rajan teli press conference konkan sindhudurg

वाढीव वीज बिलासंदर्भात महावितरणच्या अनागोंदी कारभारबाबत कणकवली, कुडाळ येथील प्रमुख अधिकाऱ्यांना भाजपच्यावतीने उद्या (ता. 9) जाब विचारण्यात येणार असल्याचेही तेली म्हणाले

वीज बिलांबाबत तेलींचा संताप, आरोग्य यंत्रणेच्याही मुद्द्यावर बोट

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची रिक्त पदे लक्षात घेता ती तत्काळ भरावी, यामध्ये 13 वर्षे प्रामाणिक काम करणाऱ्या एनआरएचएमच्या लोकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी उद्या (ता. 9) जिल्ह्यात येणाऱ्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे सांगितले. वाढीव वीज बिलासंदर्भात महावितरणच्या अनागोंदी कारभारबाबत कणकवली, कुडाळ येथील प्रमुख अधिकाऱ्यांना भाजपच्यावतीने उद्या (ता. 9) जाब विचारण्यात येणार असल्याचेही तेली म्हणाले. 

येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहांमध्ये तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, महेश धुरी, राजू राऊळ, मोहन सावंत, अमित परब, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. तेली म्हणाले, ""पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमधील कोविड लॅबचे लोकार्पणनिमित्त उद्या (ता.9) जिल्ह्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे येत आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील विविध समस्या त्यांच्या समोर मांडू. त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत.'' तेली म्हणाले, मुंबई-पुणे या ठिकाणावरून येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासासाठी पास मिळत नसताना दुसरीकडे मात्र खाजगी बसवाल्यांना लगेच पास उपलब्ध होतो. एकीकडे चाकरमान्यांना लुटणाऱ्यांनाच तत्काळ पास मिळतो. याचा काय अर्थ? चाकरमान्यांच्या पास संदर्भातही फडणवीस यांचे लक्ष वेधू. 

प्रामाणिक सेवेला प्राधान्य द्या 
कोरोनाचे संकट कधी संपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील 534 रिक्त पदे तत्काळ भरावीत. ही पदे भरताना 13 वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एनआरएचएमच्या लोकांना प्राधान्याने भरती करावे, काही डॉक्‍टरांचे पगारही चार महिने झाले नाहीत त्यांचे पगार तातडीने द्यावे, मायनिंग फंडातील पैसे आजही जिल्हा प्रशासनाला वापरण्याची परवानगी मिळाली नाही ती परवानगी द्यावी, अशा मागण्या फडणवीस यांच्याकडे करणार आहे.'' 

सत्ताधाऱ्यांवर टीका 
जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचेच जिल्हाध्यक्ष अधिकारी वर्गांची बदली करण्याची मागणी करत आहेत. एकीकडे सत्ता यांची मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे असे असतानाही बदलीसाठी आंदोलनाची भाषा वापरणे म्हणजे त्यांचे त्यांना अधिकारच माहित नसल्यासारखे आहे, अशी टीकाही तेली यांनी केली. तसेच उद्या (ता.9) वाढीव वीज बिलासंदर्भात कुडाळ, कणकवली येथील वीज वितरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भाजपच्या माध्यमातून जाब विचारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - राहुल पाटील

loading image