राजापूर : शेतीत केले विविध प्रयोग; शाश्‍वत उत्पन्नाचा शोधला स्रोत

उन्हाळी शेतीतून लाखोंची उलाढाल, झेंडू, मका,
 शेतीत केले विविध प्रयोग
शेतीत केले विविध प्रयोगsakal

राजापूर: तालुक्यातील शेतकरी संदेश धुरी यांनी जुवाठी येथे उन्हाळी हंगामामध्ये सुमारे तीन एकर क्षेत्रामध्ये झेंडू, मका, कलिंगड, मिरची, भोपळा, भाजीपालासह अन्य विविध प्रकारची शेती केली आहे. त्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल करताना स्वतःसह इतरांनाही त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. खर्चाच्या तुलनेमध्ये कमी उत्पन्न मिळत असल्याने शेतीक्षेत्राकडे अर्थार्जनाचा मुख्य स्रोत म्हणून पाहताना अनेकांकडून नाके मुरडली जाताना दिसतात. मात्र, संदेश यांनी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने विविध प्रकारची शेती करून शेती हा उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत असल्याचे कृतियुक्त उदाहरण साऱ्‍यांसमोर ठेवले आहे.

जुवाठी येथे संदेश यांनी सुमारे तीन एकर क्षेत्रांमध्ये विविध प्रकारची उन्हाळी शेती केली आहे. वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी करण्याचा ध्यास घेत शेती क्षेत्राची कास धरल्याचे ते सांगतात. शेत नांगरणी करण्यासह औषध फवारणी, ठिबक सिंचन यंत्रणा उभारणी करणे, खतांची मात्रा देणे आदी कामांसाठी मजुरांची वाट पाहण्याऐवजी दिवसरात्र स्वतः राबून संदेश यांनी शेतीचा मळा फुलवला आहे. उन्हाळ्यामध्ये अनेकवेळा भोपळा केला जात नाही. मात्र, उन्हाळ्यातील भोपळा लागवडीचे धाडस त्यांनी केले असून, त्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. उन्हाळी शेती करताना काजू, नारळ आदींचीही त्यांनी लागवड केली असून, त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com