कर्जमाफीतून डावलले; शेतकरी करणार उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

राजापूर - मोठा गाजावाजा करीत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा घोळ अद्यापही सुटलेला नाही. शासनाच्या सूचनेनुसार रीतसर अर्ज करून देखील अद्याप कर्जमाफी न झाल्याने तालुक्‍यातील तेरवण गावचे शेतकरी अनंत शिवराम चव्हाण यांनी त्याविरोधात मंत्रालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. पुढील महिन्यामध्ये (ता. १५ फेब्रुवारी) हे उपोषण छेडण्यात येणार असल्याचे निवेदन राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेऊन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रमाण वाढत असताना शासनाने शेती कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना विहित नमुना आणि कालावधीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले. या अर्जानंतर पुढील कार्यवाही अपेक्षित असताना निर्माण झालेला घोळ अद्याप सुटलेला नाही. श्री. चव्हाण यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या भू शाखेतून सुमारे दीड लाखाचे शेतीकर्ज घेतले होते. मात्र प्रतिकूल हवानामाचा फटका बसून झालेल्या नुकसानीमुळे त्यांना शेतीकर्जाची परतफेड करणे शक्‍य झाले नव्हते. 

तालुक्‍यातील तेरवण येथील श्री. चव्हाण यांनीही सुमारे दीड महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. श्री. चव्हाण यांनी बॅंकेकडे जाऊन आपल्यालाही कर्जमाफी मिळाली आहे का, याची चौकशी केली . त्यांना कोणतीही कर्जमाफी मिळाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कर्जमाफीच्या निकषामध्ये बसत असतानाही आपल्याला कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याबद्दल श्री. चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबद्दल पुढील महिन्यामध्ये थेट मंत्रालयासमोर ते उपोषण करणार आहेत.

Web Title: rajapur konkan news farmer fasting loanwaiver