गंगातीर्थी शुकशुकाट; निर्गमनाचे संकेत...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

गायमुखातील प्रवाह थांबला - अन्य कुंडांत पाणी
राजापूर - तब्बल चाळीस दिवसांच्या वास्तव्यानंतर उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या गंगामाईकडून निर्गमनाचे संकेत मिळू लागले आहेत. आगमनापासून मोठ्या प्रमाणात प्रवाहित असलेल्या गंगास्थानच्या काशिकुंडातील पाण्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून कमी झाले आहे. गायमुखातील पाण्याचा प्रवाहही थांबला आहे. मूळ गंगेसह अन्य कुंडातील पाण्याची पातळी अद्यापही कायम आहे.

सध्या शेती हंगाम आणि शाळा सुरू झाल्यामुळे गंगास्थानी भाविकांची गर्दी कमी झाली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे गेल्या महिन्यामध्ये १७१ दिवसांनी आगमन झाले. दर तीन वर्षानी आगमन होण्याचा गंगामाईचा प्रघात असताना गेल्या काही वर्षांपासून गंगामाईचे सातत्याने आगमन होते. गंगामाईच्या आगमन आणि निर्गमनाचे साऱ्यांनाच कोडे पडले आहे. आगमनानंतर चाळीस दिवस प्रवाहित असलेल्या गंगेमध्ये स्नानाची पर्वणी अनेकांनी साधली. दोन दिवसांपूर्वी अचानक काशिकुंडातील पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. हे गंगामाईच्या निर्गमनाचे संकेत असल्याचे जाणकारांनी सांगितले. गायमुखातील प्रवाह थांबला असली, तरी वडाच्या झाडाखालील मूळगंगा आणि अन्य कुंडातील प्रवाह कायम आहेत. त्यामुळे गंगामाईचे आणखीन किती दिवस वास्तव्य राहणार याची साऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: rajapur konkan news gangamai water

टॅग्स