ब्रिटीशकालीन मुसाकाझी बंदर अद्याप दुर्लक्षितच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

सोयीसुविधांची वानवा - प्रवासी शेडची दुरावस्था; पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे

राजापूर - ब्रिटीश काळामध्ये कोकण किनारपट्टीवरून चालणाऱ्या जलवाहतुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे मुसाकाझी बंदर विकासाअभावी केवळ नावापुरतेच उरले आहे. अर्जुना नदीच्या मुखाशी असलेल्या या मुसाकाझी बंदरात विविध सोयीसुविधांची वानवा आहे. या बंदराचा विकास झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळेल.

ब्रिटीशांच्या काळामध्ये निर्यातकेंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजापूर बंदरामध्ये जैतापूरमार्गे येणारी मालवाहतूक जहाजे, गलबते मुसाकाजी बंदरातून होत होती. ही वाहतूक थांबल्यानंतर या बंदराकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील जेटीची शासनाकडून डागडुजी झाली आहे. येथील प्रवासी शेडसह अन्य वस्तूंचीही दुरवस्था झाली आहे. बंदराच्या दुरवस्थेमुळे मच्छीमारांना समुद्रातून मासेमारी करून आणलेले मासे उतरविणे दुरापास्त होते. त्यामुळे बहुतांश मच्छीमार मासे उतरविण्यासाठी मुसाकाझी बंदरामध्ये थांबण्याऐवजी धाऊलवल्ली येथे नौका उभ्या करणे पसंत करीत आहेत.  अर्जुना नदीच्या मुखाशी असलेल्या बंदराच्या एका बाजूला जैतापूर, साखरीनाटे असा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याच्या संरक्षणासाठी बांधलेला विजयदुर्ग किल्ला आहे. 

Web Title: rajapur konkan news musakajhi port ignored