राजापूर समितीचा टॅंकर लांजाकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

राजापूर - गेल्या काही दिवसांमध्ये उष्मा वाढल्याने तालुक्‍याला पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्‍यता आहे. संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी पंचायत समिती सज्ज झाली आहे. मात्र, टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे असलेला टॅंकर गतवर्षीपासून लांजा पंचायत समितीला दिला आहे. त्यामुळे पाणीटंचाईपूर्वी लांजाकडे असलेला टॅंकर आणण्यामध्ये पंचायत समिती प्रशासनाला आपली ताकद खर्ची घालावी लागणार आहे. 

राजापूर पंचायत समितीचा टॅंकर लांजा पंचायत समितीच्या ताब्यात असल्याबाबत राजापूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सदस्यांनी नापसंती केली. लांजाकडे असलेला टॅंकर तातडीने पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याच्या सूचना प्रशासनाला देताना त्याबाबतचा एकमुखी ठरावही केला. 

तालुक्‍याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून लाखो रुपयांचा निधी दरवर्षी खर्च होतो. मात्र, पाणीटंचाईची स्थिती जैसे थे राहते. सध्या उष्म्याचे प्रमाण वाढल्याने नैसर्गिक जलस्रोतांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्‍याला पाणीटंचाईच्या झळा बसण्याची चिन्हे आहेत. टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना पंचायत समितीतर्फे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हा टॅंकर पंचायत समितीकडे आहे. मात्र, गतवर्षी टंचाईची स्थिती असतानाही प्रशासनाने एकाही गाव वा वाडीला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा न केल्याने पंचायत समितीच्या ताब्यातील टॅंकर लांजा पंचायत समितीकडे वळविण्यात आला. टंचाईची स्थिती संपुष्टात आल्यानंतर हा टॅंकर लांजा पंचायत समितीकडून पुन्हा राजापूर पंचायत समितीच्या ताब्यात देणे अपेक्षित होते. मात्र, तो टॅंकर लांजा पंचायत समितीने अद्यापही दिलेला नाही. त्यामुळे लांजा पंचायत समितीकडे असलेला टॅंकर तातडीने पुन्हा राजापूर पंचायत समितीकडे द्यावा असा ठराव पंचायत समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला.

गतवर्षीच्या चुकीची पुनरावृत्ती नको
गतवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये तालुक्‍यातील २१ गावांतील २९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. या गावांमधील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. पंचायत समिती प्रशासनाने संबंधित गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केलेला नाही. टॅंकरमुक्त तालुका दाखविण्याच्या धडपडीमध्ये संबंधित गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला नसल्याचे बोलले जाते. गतवर्षीच्या चुकीच्या निर्णयाची यावर्षी पुनरावृत्ती नको, अशी तंबी सदस्यांनी प्रशासनाला दिली.

Web Title: rajapur konkan news water tanker water shortage