राजापूरवासीयांची आजची सायंकाळ धक्कादायकच ; त्या कुटुंबातील आणखीन तिघेजन पॅाझीटीव्ह...

rajapur more 8  corona positive patient in ratnagiri
rajapur more 8 corona positive patient in ratnagiri

राजापूर (रत्नागिरी)  : दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या वडदहसोळ आणि कशेळी येथील त्या कुटुंबातील आणखीन तिघेजनासह एकाच दिवशी तब्बल आठजन कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राजापूरवासीयांची आजची सायंकाळ धक्कादायक आणि चिंताजनक ठरली आहे. 


तालुक्यात कोरोनाचे दिवासागणिक संक्रमण वाढताना विखारे गोठणे,  कशेळी, वडदहसोळ पाठोपाठ आता ओनी आणि प्रिंदावन अशा नवीन दोन गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये प्रिंदावनमध्ये तब्बल चार रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा झपकन दुप्पट होताना आता पाच गावांमधून तेरावर जाऊन पोहोचला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये कोरोनाबाधीत रूग्ण आढळलेले असताना राजापूर तालुका मात्र सेफ झोनमध्ये होता. अशातच मागील काही दिवसांपासून तालुक्यात मुंबईकर चाकरमानी दाखल होऊ लागल्याने तालुक्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये विखारे गोठणे येथे एक, कशेळी आणि वडदहसोळं येथे प्रत्येकी दोन असे पाच रुग्ण आढळले होते.

त्यानंतर, गेले दोन तीन दिवस तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे राजापूरवासीय काहीसे निर्धास्त झाले होते. मात्र, आजच्या सायंकाळच्या वैद्यकीय अहवालाने राजपुरकरांची झोप उडविली आहे. आज तालुक्यामध्ये तब्बल आठ कोरोनो पॅाझीटीव्ह रुग्ण सापडले आहेत. वदडहसोळ येथील ज्या कुटुंबातील यापूर्वी दोन कोरोनो पॅाझीटीव्ह सापडले होते त्याच कुटुंबातील आज आणखीन दोघेजण रुग्ण आढळले आहेत. तर, कशेळीमधील त्या कुटुंबातील आणखीन एका रुग्णाची भर पडली आहे.

हेही वाचा- जिल्ह्याच्या हितासाठी आम्ही उद्रेकाच्या उंबरठ्यावर  : नितेश राणेंचा इशारा ..
या दोन गावा व्यतिरिक्त आज ओनी आणि प्रिंदावन अशा नवीन दोन गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ओंनीमध्ये एक रुग्ण असून प्रिंदावन येथे एकाचवेळी तब्बल चार रुग्ण आढळले आहे. त्यामुळे तालुक्यात आता रुग्णाची संख्या झपकन वाढ होताना ती दुप्पट म्हणजे ती तेरावर जाऊन पोहचली आहे. कोरोना पॅाझीटीव्ह रुग्णाच्या दुप्पट झालेल्या संख्येमुळे तालुक्यात आता काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com