कोरीनॲन्ड्रा इलिगन्स फूलझाडाचा शोध

राजेंद्र बाईत
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

राजापूर - तालुक्‍यात डबक्‍यामध्ये पावसाळ्यात उगवणाऱ्या ‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स चांदोरे, यू. एस. यादव ॲन्ड एस. आर. यादव’ या नव्या फुलवनस्पतीचा शोध लावण्याची कामगिरी येथील डॉ. अरुण चांदोरे व डॉ. एस. आर. यादव, डॉ. उषा यादव या तिघांनी केली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमाने त्यांनी हा शोध लावला. साखरकोंबे परिसरामध्ये या वनस्पतीचा आढळ आहे. यामुळे कमी उंचीच्या कातळ परिसरामध्ये दुर्मीळ वनस्पतींचा खजिना असल्याचे अधोरेखित झाले आहे.

राजापूर - तालुक्‍यात डबक्‍यामध्ये पावसाळ्यात उगवणाऱ्या ‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स चांदोरे, यू. एस. यादव ॲन्ड एस. आर. यादव’ या नव्या फुलवनस्पतीचा शोध लावण्याची कामगिरी येथील डॉ. अरुण चांदोरे व डॉ. एस. आर. यादव, डॉ. उषा यादव या तिघांनी केली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमाने त्यांनी हा शोध लावला. साखरकोंबे परिसरामध्ये या वनस्पतीचा आढळ आहे. यामुळे कमी उंचीच्या कातळ परिसरामध्ये दुर्मीळ वनस्पतींचा खजिना असल्याचे अधोरेखित झाले आहे.

ही वनस्पती राजापूर तालुक्‍यातील साखरकोंबे, जैतापूर, नाटे परिसरापासून ते थेट देवगड तालुक्‍यापर्यंत आढळली. रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. चांदोरे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पती विभागातील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. श्री. यादव आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या सौ. यादव यांच्या नजरेला कातळावर ही वनस्पती पडली. त्याची माहिती न मिळाल्याने त्यामुळे त्याच्या संशोधनाचा ध्यास घेतला. 
या संशोधनामध्ये प्रा. डॉ. शरद कांबळे, डॉ. अविनाश घोळवे, प्रा. डॉ. मनोज लेखक, डॉ. प्रा. श्रीकांत सुतार, प्रा. देवीदास बोरूडे, प्रा. संतोष मेंगाळ, प्रा. डॉ. ए. बी. तपासे या सहकारी शिक्षकांसह प्रतीक नाटेकर, नीलेश धुमाळ या विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले. 

असे झाले नामकरण
वर्षभराच्या कालावधीमध्ये संशोधन आणि अभ्यास करून शोध लागलेल्या या वनस्पतीचे नामकरणही या संशोधक त्रयींनी केले. दिसायला आकर्षक आणि देखणे फूल पाहिल्यानंतर कोणाच्याही तोंडून ‘ब्युटीफूल’ असे शब्द बाहेर पडतात. हाच धागा पकडून या फुलाला ‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स’ हे नाव दिले, अशी माहिती प्रा. अरुण चांदोरे यांनी दिली. जागतिक स्तरावर प्रा. चांदोरे आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या नावानेच वनस्पती ओळखली जाते. 

‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स’चा जीवनक्रम
मे महिन्यात जेथे वनस्पती रुजते, त्याची सविस्तर माहिती घेऊन अभ्यास करण्यात आला. पहिल्या पावसानंतर जमिनीमध्ये असलेल्या झाडांच्या मुळांची (रूट सकर) रुजवात होऊन जमिनीलगत पाने येतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडाला महिन्याभराच्या कालावधीमध्ये फुले येतात. १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये फुलाला बहर असतो. सर्वसाधारण सप्टेंबरमध्ये फळधारणा आणि नोव्हेंबरला हंगाम संपतो. जानेवारीत ही वनस्पती दिसेनाशी होते. फेब्रुवारी ते एप्रिल कालावधीमध्ये ही जागा पडिक दिसते. मात्र पावसाळ्यानंतर पुन्हा ती रुजते. 

संशोधित नवी वनस्पती अशी नोंद
सदाबहार आणि लक्ष वेधून घेणाऱ्या ‘कोरीअनॲन्ड्रा इलिगन्स’(Corynandra elegans) या फुलवनस्पतीची संशोधित वनस्पती म्हणून जागतिक स्तरावर ९ मे, २०१६ रोजी न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्‍सा (PHYTOTAXA)’ या जागतिक दर्जाच्या नियतकालिकाने नोंद केली आहे. त्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठासह वेबसाईटवर फुलाची छबी आहे. नव्या संशोधित वनस्पतींचा समावेश असलेल्या देशातील ‘बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ (PLANT DISCOVERIES) या पुस्तकामध्येही संशोधित नवी वनस्पती म्हणून नोंद झाली आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही दोन महिन्यापूर्वी (५ जून, २०१७) त्याची छबी छापून आली आहे.

Web Title: rajapur news Corinandra eligans

टॅग्स