काही क्षणांची ताटातूट अन्‌ मायलेकीची पुनर्भेट...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

राजापूर - चिमुरडीची आईसह घरच्यांशी झाली ताटातूट. मुलगी बेपत्ता झाल्याने साऱ्यांचा जीव टांगणीला. गर्दीत कोणीच ओळखीचे नसल्याने रस्त्यातच तीन वर्षांच्या चिमुरडीने फोडलेला हंबरडा. साऱ्यांनाच कासावीस करणारा प्रसंग. ससाळेच्या सरपंच अमृता शिवगण, रोमेश नार्वेकर, राजापूरचे पोलिस आणि शिवसैनिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने चिमुरडीची कुटुंबाशी भेट झाली आणि ज्याचा शेवट गोड ते सारे गोड या न्यायाने साऱ्यांचे चेहरे फुलले. 

जवाहर चौक ते जकात नाका या वर्दळीच्या रस्त्यावर न्यायालयानजीक लहान मुलगी बराचवेळ रडत उभी असल्याचे सौ. शिवगण यांच्या लक्षात आले. मुलीने कोणतीही माहिती दिली नाहीच, फक्त हुंदके सुरू होते. पंधरा-वीस मिनिटे गेल्यावर सौ. शिवगण यांच्यामधील ‘आई’ जागी झाली. मुलीसह त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालय गाठले. तेथील श्री. नार्वेकर, कोदवलीचे माजी सरपंच विवेक मांडवकर, संजय पेडणेकर यांनी मुलीचे नातेवाईक शोधणे सुरू केले. राजापूर पोलिसांशी संपर्क साधल्यावर पोलिस सूरज मुजावर आणि अलका साळुंखे तेथे आल्या. 

मुलीला चॉकलेट देऊन बोलते करण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. एका महिलेने ही मुलगी आपल्या शेजाऱ्यांची असल्याचे सांगितले. त्या महिलेने रडवेल्या मुलीला बोलावताच ती त्यांच्या कुशीत शिरली. मुलीची आई घरी गेली, तेव्हा घरात मुलगी नसल्याचे लक्षात आले. साऱ्यांचा जीव टांगणीला लागला तेवढ्यात शेजारीने मुलगी मिळाल्याचे सांगितले. तत्काळ त्या शिवसेना कार्यालयात आल्या आणि मुलगी त्यांना 
चिकटली.

Web Title: rajapur news police