राजापूर ग्रामीण रुग्णालयाला वीस लाखांचा जनरेटर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

राजापूर - तालुक्‍यातील राजापूर ग्रामीण रुग्णालयाला सुमारे वीस लाखांचा जनित्र (जनरेटर) उपलब्ध झाला आहे. विजेअभावी रखडणाऱ्या सर्जरी कोणत्याही वेळी करता येणार आहेत. आमदार राजन साळवी यांच्या हस्ते हा जनरेटर ग्रामीण रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, नगरसेवक अनिल कुडाळी, पंचायत समितीच्या सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, योगिता साळवी, विनय गुरव, अभय मेळेकर, डॉ. उमेश चव्हाण, डॉ. मेस्त्री आदी उपस्थित होते. 

चोवीस तास विजेची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णालयात सर्जरी होत नाहीत. गेली कित्येक वर्ष ग्रामीण रुग्णालयामध्ये चोवीस तास विजेची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जनरेटरची मागणी ग्रामीण रुग्णालयाकडून करण्यात आली होती. आमदार साळवी यांनी जनरेटर मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Web Title: Rajapur rural hospital generator