राजापूर तालुक्‍यातही मतांचा टक्का घसरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

राजापूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्‍यात ६८ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये महिलांची संख्या (३७ हजार ४९८) पुरुषांच्या (३० हजार ९३७) तुलनेमध्ये जास्त आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तालुक्‍यातील मतांचा टक्का कमी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना आणि भाजप अशा तिरंगी होत असलेल्या लढतीमध्ये घटलेला मतांचा टक्का कोणाला ठेंगा दाखविणार आणि कोणाला तारणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्‍यामध्ये पक्षांतर्गत बंडाळी आणि कुरघोडींच्या राजकारणामधून क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे.

उद्या सकाळी १० वाजता तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरवात होणार आहे. सुमारे दोन तासांच्या कालावधीमध्ये निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती जागांसाठी तालुक्‍यात निवडणूक होत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी २१ तर, पंचायत समितीसाठी ३९ असे साठ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली;मात्र पक्षांतर्गत बंडाळी आणि कुरघोडींच्या राजकारणामुळे या निवडणुकीतील चुरस अधिकच वाढल्याने ही निवडणूक रंगतदार झाली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्‍यातील १९१ मतदान केंद्रावर काल मतदान झाले. त्यामध्ये १ लाख १४ हजार ३८० मतदारांपैकी ६८ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये झालेल्या झालेल्या मतदानाचा विचार करता कोदवली गटामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. १२ गणांमध्ये कोदवली गणामध्ये (६६.४९ टक्के) सर्वाधिक मतदान झाले आहे. कोदवली गटामध्ये तिरंगी, तर कोदवली गणामध्ये चौरंगी लढत झाली. कोदवली गणामध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या गट आणि गणामध्ये चुरस आहे.

अपक्षांच्या मताधिक्याची उत्सुकता
पाचल गटातून पूर्वा पाथरे, ओणी गटातून संतोष पावस्कर, सागवे गटातून रोशनी मोंडे, कोदवली गणातून अभिजित गुरव, अणसुरे गणातून भरत मिरगुले हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. अपक्षांचे मताधिक्‍य आणि ताकद निर्णायकी ठरणार आहेत. त्यामुळे अपक्ष कोणता चमत्कार करणार याची साऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: Rajapur takula percent drop in votes