पावसाळ्यात प्रकटली राजापुरची गंगा

राजेंद्र बाईत
रविवार, 8 जुलै 2018

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे 109 दिवसांनी उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. पावसाळ्यात गंगा प्रकटली आहे. उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहीत आहे.
 

राजापूर- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे 109 दिवसांनी उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. पावसाळ्यात गंगा प्रकटली आहे. उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहीत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना गंगामाईच्या अचानक झालेल्या आगमनाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गंगामाईच्या आगमनाबाबचे निश्‍चित कारण समजले नसले तरी, त्याबाबत विविध तर्क वितर्कही लढविले जात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, यापूर्वी तब्बल पंधरावेळा पावसाळ्यामध्ये गंगामाईचे आगमन झाले असून यावेळी सोळाव्यांदा झाले आहे. 

राज्याच्या कानाकोपर्‍यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे 6 डिसेंबर, 2017 रोजी आगमन झाले होते. त्यानंतर 105 दिवस वास्तव्य केल्यानंतर 20 मार्च, 2018 रोजी गंगामाईचे पुनरागमन झाले होते. त्यानंतर, 109 दिवसांनी पुन्हा एकदा गंगामाईचे तीर्थक्षेत्री आगमन झाले.

गंगा देवस्थानचे श्रीकांत घुगरे, राहुल काळे, साने आदी पदाधिकारी आज सकाळी नेहमीप्रमाणे गंगातीर्थक्षेत्री गेले असता त्यांना गंगामाईचे आगमन झाल्याचे निदर्शनास आले. आगमनाच्या सुरूवातीचे काही तास केवळ मूळ गंगा प्रवाहित होती. आगमनानंतर सुमारे दोन तासांचा कालावधी उलटल्यानंतर काशीकुंड्याच्या येतील गायमुखही प्रवाहित झाले.

Web Title: Rajapurs Ganga river started in rainy season