राजिप पिलोसरी शाळेत साजरी झाली पर्यावण पूरक शैक्षणिक हंडी

pali
pali

पाली -  सुधागड तालुक्यातील राजिप पिलोसरी शाळेत सोमवारी (ता.3) पर्यावण पूरक शैक्षणिक हंडी साजरी केली. तसेच पाणी बचतीचा संदेश दिला.

सोमवारी शाळेला सुट्टी नव्हती. शाळेत जन्माष्टमी साजरी करायचे असे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी ठरविले. त्यात 1ते 15 सप्टेंबर स्वच्छ भारत पंधरवडा संपन्न होत आहे. दहीहंडी च्या सणात पाणी खुप वाया जाते त्या ऐवजी पिलोसरी शाळेने शैक्षणिक हंडी साजरी करण्याचे ठरविले.

या हंडीमध्ये विणापाणी दही चा वापर न करता त्यामध्ये संस्कारिक व पर्यावरणीय छोटी पुस्तके, कागदी पेन्सिल, खोडरबर, लाह्या व चॉकलेट्स अशी ही वैविध्यपूर्ण शैक्षणिक हंडी बनवली. ह्या हंडी निमित्त सर्व मुलांनी फेर धरून ताल धरला. उपशिक्षिका सुचिता तेजे यांनी पारंपरिक गीत गायले. मुलांनी व मुलींनी मनोरे रचून हंडी ला सलामी दिली. 1ली ते 4 थी च्या बाळ गोपाळांनी पर्यावरण पूरक दहिहंडी चा आनंद घेतला. मुलांनी शैक्षणिक हंडी फोडून जे साहित्य मिळाले ते वाटून घेतले. अशा प्रकारे ह्या हंडी मुळे पाणी बचतीचा संदेश विद्यार्थ्यां पर्यन्त पोहचला तसेच उपयुक्त शैक्षणिक साहित्य देखील मिळाले.

दरवर्षी सुट्टी असल्याने आम्ही गावातच गोविंदा खेळतो व खुप पाणी संपवयचो. पण ह्या शाळेतील हंडीमुळे आम्हाला पाण्याची गरज लागलीच नाही आम्ही पाणी वाचवले व हंडी पण फोडली खुप मज्जा आली
सार्थक चव्हाण, विद्यार्थी,राजिप शाळा पिलोसरी, इयत्ता ४थी

स्वच्छ भारत पंधरवडा चालू असताना मुलांना प्रत्यक्ष पाणी बचत फक्त सांगून होणार नाही. तर गोपाळकाला व धुलिवंदन आशा सणांना पाणी वाया घालवू नये,अन आपली सणाची परंपरा कशी जोपासता येईल यासाठी शैक्षणिक हंडी उपक्रमातून शाळा पिलोसरी ने दिलेला हा पाणी बचतीचा अल्पसा संस्कार.
राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक, राजिप शाळा पिलोसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com