राजिप शाळा पिलोसरीच्या विद्यार्थ्यांनी व गावकर्यांनी घेतला स्वच्छतेचा वसा

राजिप शाळा पिलोसरीच्या विद्यार्थ्यांनी व गावकर्यांनी घेतला स्वच्छतेचा वसा

पाली - रा.जि.प.शाळा पिलोसरी येथे १ सप्टेंबर पासून स्वच्छ भारत पंधरवडा अंतर्गत विविध स्वच्छता विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी, शिक्षक व गावकर्यांनी स्वच्छता शपथ घेऊन स्वच्छतेचा वसा घेतला. तसेच  प्लॅस्टिक सोडून कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प केला.

गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाची स्वच्छ्ता केली. पाणवठे साफ केले. शाळेतील सर्व मुलांनी स्वच्छतेचे व धूम्रपान विरोधी संदेश फलक हाती घेत गावातून रॅली काढली.  स्वच्छतादूत व स्वच्छ कुटुंब सर्वेक्षण या उपक्रमात शाळेतील 7 मुलांची स्वच्छतादूत म्हणून निवड करून त्याना स्वच्छ कुटुंब सर्वेक्षण कार्ड देण्यात आले. त्यामध्ये स्वच्छ्ता विषयक 8 प्रश्नाचा समावेश होता. या मुलांनी एकूण 40 प्रातिनिधिक कुटुंबाचे सर्वेक्षण केले. यातून असे दिसून आले की काही घरात अजून शौचालय नाही आहे तर काही ठिकाणी वापर नाही, काही घरात शोषखड्डा नाही तर काही ठिकाणी त्यावर परसबाग दिसली. काही घरात पाण्याचे फिल्टर दिसले तर काही घरात ओग्राळ वापर नाही. काही कुटुंबे हात धूण्यासाठी हॅन्डवॉश वापरतात तर काही राखाडी पण नाही. यामूळे मुलांना आपल्या घरची व गावातली स्वच्छतेची खरी परिस्थिती, जाणीव झाली अन हे सर्व ह्या मुलांनी कृतीतून शिकले. 

जागतिक साक्षरता दिनी साक्षरता व शिक्षणाचे महत्व प्रबोधन कारण्यासोबत स्वच्छता साक्षरता करण्यावर भर दिला.  प्लास्टिक वापर न करता कापडी पिशवी वापर कसा करता येईल यासाठी पिलोसरी शाळेचे माजी विद्यार्थी व भार्जे गावचे रहिवासी विश्वास गोफण यांनी चालवलेल्या कापडी पिशवी वापर व वाटपाचा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,माता पालक संघ सर्व पालक व खवली केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश रोहेकर ह्या उपक्रमात सहभाग घेतला. गोफण यानी आत्ता पर्यन्त  60 हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले आहे. पिशव्यांवर बोधपर लिहीलेली घोषवाक्य प्रेरक आहेत. या पर्यावरण पूरक उपक्रमामुळे बालवयात मुलांना स्वच्छ्ता व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार घडले. गोफण यांच्या अभियानास हातभार लागावा यासाठी शाळेतील साक्षी बोरीटकार, प्रथमेश माने, संस्कृती व समृद्धी नाडकर, अनुष्का चव्हाण, सोहम घोसाळकर, परी यादव ह्या मुलांनी गोफण याना पिशवी तयार करण्यासाठी स्वतः घरातले कापडदान  केले. 

चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. मुले आपल्या अभिरुचिनुसार प्रकट झाली.अन स्वच्छतेचे महत्व कृतीयुक्त अंगीकृत केले. या सर्व उपक्रमासाठी मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी मार्गदर्शन केले. तर शाळेच्या उपशिक्षिका सुचिता तेजे यांनी शिक्षक स्वच्छतादूत म्हणून विशेष मेहनत घेतली.

स्वच्छ भारत पंधरवडा अंतर्गत शासनामार्फत विविध उपक्रम ह्या पंधरवड्यात राबवत असताना ती एक औपचरिकता होता कामा नये. स्वच्छता सांगण्यापूरता विषय न होता हा संस्कार कृतीयुक्त होण्यासाठी पिलोसरी शाळेने हे स्वच्छता उपक्रम हाती घेतले. त्यातून स्वच्छतेचा हा संस्कार आणि जाणीव मुलांमध्ये चिरकाल राहील ही आशा आहे.
राजेंद्र अंबिके, मुख्यध्यपक, राजिप शाळा पिलोसरी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com