esakal | लयभारी ! टाकाऊ वस्तूंपासून बनवल्या आकर्षक राख्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Made From Waste Material Ratnagiri Marathi News

घरातील टाकाऊ वस्तू तसेच अन्नधान्ये, कडधान्ये यांचा वापर करून सुंदर अशा कल्पनेतून चाराठे शाळा क्रमांक 1 च्या मुलांनी राख्याची निर्मिती केली आहे.

लयभारी ! टाकाऊ वस्तूंपासून बनवल्या आकर्षक राख्या 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - रक्षाबंधन सण जवळ येत असल्याने मोठ्या प्रमाणात राख्या विक्रीला सुरुवात झाली आहे. बाजारात विविध प्रकारच्या रंगेबिरंगी राख्या पाहायला मिळतात; मात्र भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी चराठे शाळा क्रमांक 1 च्या मुलांनी एक वेगळाच कल्पना हाती घेतली. घरातील टाकाऊ वस्तू व कडधान्यापासून सुंदर सुबक राख्या बनवल्या आहेत. त्या उपक्रमाबाबत मुलांचे कौतुक होत आहे. 

सध्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. मुख्याध्यापक वर्षा देसाई यांच्या नियोजनानुसार मुलांनी घरीच राहून रक्षाबंधनास अनेक रंगेबिरंगी राख्या बनवल्या आहेत. मुलांना आपली संस्कृती व सण यांचे महत्त्व समजावे म्हणून शाळेने या उपक्रमाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केले आहे. त्यामुळे मुलांना स्वतः निर्मितीचा आनंद मिळाला. त्याचप्रमाणे स्वतः तयार केलेल्या राख्या बांधण्याचा अथवा बांधून घेण्याचा आनंद मोठा असतो हेसुद्धा या माध्यमातून मुलांना समजले.

घरातील टाकाऊ वस्तू तसेच अन्नधान्ये, कडधान्ये यांचा वापर करून सुंदर अशा कल्पनेतून चाराठे शाळा क्रमांक 1 च्या मुलांनी राख्याची निर्मिती केली आहे. या उपक्रमासाठी मुलांना शाळेतील शिक्षक श्रावणी सावंत, अमोल कोळी, बापूशेठ कोरगावकर धनदा शिंदे, निलांगी गावडे, जयश्री पेडणेकर, अनघा निरवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक वर्षा देसाई, सरपंच रघुनाथ सरपंच रघुनाथ वाळके, सरपंच रघुनाथ वाळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र पटेकर, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत आणि गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी मुलांनी राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबाबत कौतुक केले. 

loading image