'सैनिक हो तुमच्यासाठी...'; जि. प. शाळांतील मुलांनी सैनिकांसाठी राख्या सीमेवर केल्या रवाना

अमित गवळे 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

अापल्या सैनिकांच्या ऋणातून मुक्त होणे हे जरी अवघड असले त्यांच्या कृतज्ञतेपोटी रक्षाबंधन विशेष उपक्रमातून सुधागड तालुक्यातील राजिप शाळांतील लहानग्यांनी अापल्या हातांनी राख्या बनविल्या आहेत. या सर्व राख्या मंगळवारी (ता. 21) सीमेवर पाठविण्यात अाल्या.
 

पाली (जि. रायगड) - देशात विविध सण व उत्सव साजरे होत असतांना सीमेवर लढणारे जवान मात्र यावेळी अापल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची बाजी लावत असतात. अापल्या सैनिकांच्या ऋणातून मुक्त होणे हे जरी अवघड असले त्यांच्या कृतज्ञतेपोटी रक्षाबंधन विशेष उपक्रमातून सुधागड तालुक्यातील राजिप शाळांतील लहानग्यांनी अापल्या हातांनी राख्या बनविल्या आहेत. या सर्व राख्या मंगळवारी (ता. 21) सीमेवर पाठविण्यात अाल्या.

आपल्या भारतभूमीचे जवान कसलीही तमा न बाळगता प्रसंगी प्राणांची आहुती देऊन देशवासियांचे संरक्षण करतात. अशा सैनिकांच्या ऋणातून मुक्त होणे व त्यांच्या कृतज्ञतेपोटी रक्षाबंधन विशेष 'सैनिक हो तुमच्यासाठी' या उपक्रमातून सुधागड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, राजिप पायरीचीवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक कुणाल पवार यांच्या संकल्पनेतून साकार झाला.
 

sudhagad

रंगीबेरंगी कागद, चमकदार टिकल्या, दोरे, लोकरीचे धागे, फमशीट इ. साहित्यांचा वापर करुन सर्व जि. प. शाळेतील विद्यार्थ्यानी अापल्या चिमुकल्या हातांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोनशेहुन अधिक राख्या तयार केल्या. रक्षाबंधन विशेष उपक्रमातंर्गत सुधागड तालुक्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यानी स्वहस्ते बनवलेल्या राख्या हया सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात अाल्या अाहेत.

या राख्या बनवितांना विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता. अापण तयार केलेल्या राख्या सैनिक आपल्या हातात घालणार याचा सार्थ आनंद व अभिमान विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरुन ओसाडूंन वाहत होता. यासांरख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती वृद्धीगंत होते. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची महती कळते व सैनिकांचे आत्मबलही वाढते. - कुणाल पवार, प्रा.शिक्षक रा.जि.प.शाळा पायरीचीवाडी.

विद्यार्थ्यामध्ये सैनिंकाप्रती आत्मीयता निर्माण होऊन या विद्यार्थ्यांमधून उद्याचे राष्ट्रभक्त नागरिक तयार होतील. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास सर्व शिक्षक व विदयार्थ्यांनी खुप चांगला प्रतिसाद दिला. या राख्या मराठा एलअाय जंगी पलटन येथे पाठविण्यात येणार आहेत. - अनिल कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी.पं.स.सुधागड

Sudhagad

 

Web Title: Rakhis Sends For Jawans on Border By Jilha Parishad School Sudhagad