कुसगाव शाळेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे रक्षाबंधन

सुनील पाटकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

ऊर्दू शाळेत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींनी मराठी शाळेतील हिंदू मुलांना राख्या बांधल्या तर हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांना राख्या बांधल्या. कुसगाव शाळेत मागील पाच वर्षांपासुन हा उपक्रम साजरा होत असल्याचे मुख्याध्यापक सुधीर सकपाळ यांनी सांगितले.

महाड - सामाजिक ऐक्याची शिकवण शालेय जीवनातूनच मुलांना दिली गेली तर धर्मजाती भेद नष्ट होईल हाच धागा पकडून महाड तालुक्यातील कुसगाव येथील मराठी व ऊर्दू शाळेतील मुलामुलींनी एकमेकांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण संयुक्तपणे साजका केला.

ऊर्दू शाळेत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींनी मराठी शाळेतील हिंदू मुलांना राख्या बांधल्या तर हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांना राख्या बांधल्या. कुसगाव शाळेत मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम साजरा होत असल्याचे मुख्याध्यापक सुधीर सकपाळ यांनी सांगितले. केवळ मुलांनी नाही तर शिक्षकांनीही रक्षाबंधन साजरे केले. शिक्षिका व शालेय पोषण आहार मदतनीस यांनी शिक्षकांना राख्या बांधल्या.

Web Title: Raksha Bandhan at Kusgaon School Mahad