तालुकास्तरावर होणार "रक्षक क्‍लिनिक' 

Rakshak Clinic On Taluka Level Rajesh Tope Comment
Rakshak Clinic On Taluka Level Rajesh Tope Comment

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - राज्यात तालुकास्तरावर इंडियन मेडिकल असोशिएशनच्यावतीने (आयएमए) "रक्षक क्‍लिनिक' सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्‍लिनिक देखील सुरू करण्याचे आश्‍वासन आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, ""राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे. सध्या 120 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. मुंबईतील धारावी भागात लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्याची आवश्‍यकता असून सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जेथे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तेथे नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे सांगतानाच मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे बंधनकारक केले आहे. राज्य कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसून याबाबत आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून तसे घोषित केले जाते.'' 

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असताना खासगी दवाखाने सुरू करावे. यासाठी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आज इंडियन मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयएमएच्यावतीने शहरी भागात मोबाईल आणि कम्युनिटी क्‍लिनिक तर ग्रामीण भागात रक्षक क्‍लिनिक सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याक्‍लिनिक मध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. राज्य शासनाकडून डॉक्‍टरांच्या सुरक्षेची आवश्‍यक ती साधने पुरविण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात सामान्य जनतेला खासगी रुग्णालयातूनही उपचार मिळावेत, अशी अपेक्षा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com