दळवींचा "रामदास कदम चले जाव'चा नारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

दाभोळ - मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सक्रिय राजकारणापासून अलिप्त झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा सुरू केला आहे.

दाभोळ - मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सक्रिय राजकारणापासून अलिप्त झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा सुरू केला आहे.

आपली लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी असून ज्यांनी आजपर्यंत पक्षाशी गद्दारी केली, ज्यांनी गीतेंना आणि मला पाडण्यासाठी जाहीरपणे वक्‍तव्य केली, त्यांना गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,असे स्पष्टपणे सांगत "रामदास कदम चले जाव'ची सुरवात केली आहे. 

दळवी यांनी मतदारसंघातील दौऱ्याची सुरवात केळशी पंचायत समिती गणातून केली. शिवसेनेत गद्दारी करणारे आज पदे भोगत असतील, तर अशा गद्दारांसोबत आपण काम करणार नाही. मात्र जे घर निष्ठावंत शिवसैनिकांनी बांधले, त्या घराला जे कोणी पोखरू पाहतात, त्यांना या घरातून हाकलून लावा, अशी आमची भूमिका आहे. दळवी साहेब आपण फक्‍त हाक मारा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दिली. 

माजी उपजिल्हाप्रमुख राजू निगुडकर, माजी तालुकाप्रमुख शांताराम पवार, मंडणगडचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, माजी सभापती किशोर देसाई, युवासेना राज्य विस्तारक ऋषिकेश गुजर, महेश घोसाळकर, नरेंद्र करमरकर, माजी उपतालुकाप्रमुख दोस्तमहंमद चौगुले, मंगेश पालवणकर, माजी विभाग प्रमुख प्रकाश रहाटवळ, कृष्णा पालेकर, संदीप पावसकर आदी उपस्थित होते. 

Web Title: Ramdas Kadam Chale Jav Suryakant Dalvi comment