नारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला?

नारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला?

दाभोळ - मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी विविध मंत्रिमंडळांतील खाती सांभाळूनही नारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला? त्यांनी केवळ आपली हॉटेल, बंगले बांधले, मात्र कोकणी माणसाच्या पदरात काहीच पडले नाही, अशी टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली.

दापोली तालुक्‍यातील बुरोंडी तेलेश्‍वरनगर येथे राज्य सरोवर संवर्धन कार्यक्रमांतर्गत १ कोटी १३ लाख १५ हजार रुपये खर्चून तलावाच्या सुशोभीकरण व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजनावेळी कदम म्हणाले, ‘‘आपण मंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून कोकणामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. कोकणातील सिंचन प्रकल्प असो किंवा अन्य प्रकल्प असोत यामध्ये ठोस निधी दिला, मात्र नारायण राणे यांनी शिवसेना व काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे सांभाळूनदेखील त्यांना कोकणासाठी कोणतीही भरीव कामगिरी करता आली नाही.

पर्यावरणमंत्री म्हणून मी स्वतः दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलो व सीआरझेडची ५०० मीटरची मान्यता ५० मीटरवर आणली, तर कोळीवाड्यात ही मर्यादा पूर्णपणे शिथिल केली आहे. कोकण किनारपट्टीवरील विविध जेटी व बंदरांसाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे नारायण राणे यांना सहज करणे शक्‍य होते, मात्र ते त्यांनी केले नाही. केवळ मी व माझ्याभोवती या संकल्पनेत ते कोकणी माणसाला विसरले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण देशात हवा होती, मात्र जीएसटी व नोटाबंदीमुळे सामान्य जनता त्यांच्या विरोधात गेली असून मोदीलाट संपूर्णपणे ओसरली आहे.

आगामी काळात राज्यामध्ये शिवसेनेची मजबूत स्थिती असेल व राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com