शिवसेनेच्या संपर्कात रमेश कदम होतेच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

चिपळूण ः रमेश कदम शिवसेनेच्या संपर्कात होते, यात तिळमात्र शंका नाही. ते किती आव्हाने अथवा प्रतिआव्हाने देवोत, शिवसेनेची दारे त्यांनी ठोठावली होती, हे मी ठामपणे सांगू शकतो. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ही बाब सौम्यपणे सांगितली. मी, कदम यांच्या "पावलां'चा साक्षीदारच आहे,' अशा शब्दांत रमेश कदम यांच्यावर आमदार सदानंद चव्हाण यांनी आज येथे पलटवार केला.

खासदार गीते यांनी दोन दिवसांपूर्वी सभेत रमेश कदम शिवसेनेच्या संपर्कात होते. त्यांनी निष्ठेच्या आणि पक्षनिष्ठेच्या गोष्टी सांगू नयेत, असे म्हणत रमेश कदम यांच्याविषयी गौप्यस्फोट केला होता. त्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे कदम यांनी गीते यांना आव्हान देत ते खोटे बोलत असल्याचा दावा केला. गीते यांनी हा आरोप सिद्ध करून दाखवला नाही, तर मंत्रिपद सोडावे, असेही त्यांनी बजावले होते. या दोघांतील आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असताना आज श्री. सदानंद चव्हाण यांनी रमेश कदम यांच्याविषयीच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. या बाबत दूरध्वनीवरून बोलताना श्री. चव्हाण यांनी कदम शिवसेनेच्या संपर्कात होतेच होते. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला त्याबाबत काय करायचे, असे विचारले होते. शिवसेनेला कदम यांच्या राजकीय नीतीची कल्पना होती. त्यामुळे शिवसेना त्यांच्यासाठी आतुर नव्हती. तेच शिवसेनेच्या संपर्कात होते.

चव्हाण यांनी असे सांगितल्यावर हा विषय आपण आता का उघड केलात असे विचारता ते म्हणाले की, "गीते आमचे नेते आहेत, खासदार आहेत. त्यांना रमेश कदम खोटे पाडत आहेत. अशावेळी वस्तुस्थिती काय आहे, ते सांगणे आवश्‍यक वाटल्याने मी तोंड उघडले आहे.'

Web Title: ramesh kadam in touch of shivsena