भा.रि.प बहुजन महासंघाच्या रायगड जिल्हा सचिवपदी रमेश पवार

अमित गवळे
मंगळवार, 8 मे 2018

पाली - भा.रि.प बहुजन महासंघाच्या रायगड जिल्हा सचिवपदी आदिवासी समाजाचे नेते रमेश पवार यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाध्यक्ष दिपक मोरे व जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पाली - भा.रि.प बहुजन महासंघाच्या रायगड जिल्हा सचिवपदी आदिवासी समाजाचे नेते रमेश पवार यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाध्यक्ष दिपक मोरे व जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भा.रि.प बहुजन महासंघाच्या युवक अध्यक्षपदाची जबाबदारी रितेश देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली. तर सुधागड तालुका उपाध्यक्षपदी दगडू वाघमारे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी पक्षवाढिसाठी सर्वोतोपरी एकनिष्ठ राहून तसेच लोकचळवळीत अग्रभागी राहून सेवाभावीवृत्तीने काम करावे. स्वार्थ, त्याग व शिलाचे पालन करावे, व सतत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेवून पक्षाची ध्ययेधोरणे तळागळात प्रभावीपणे राबवावीत असे यावेळी त्यांना सांगण्यात आले.

आदिवासी, कातकरी, ठाकूर व धनगर समाजबांधवांच्या उत्कर्षासाठी रमेश पवार अनेक वर्षापासून काम करीत आहेत. त्यांच्या या कुशल नेतृत्वाचा व सामाजिक सेवाभावी वृत्तीचा पक्ष वाढीस लाभ होणार असल्याचे मंगेश वाघमारे यांनी सांगितले. यावेळी रमेश पवार यांनी भा.रि.प बहुजन महासंघाची परिवर्तनवादी, लढावू व क्रांतीकारी विचारांची चळवळ आदिवासी वाड्यापाड्यासह सर्वदूर पोहचविण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासन दिले. पक्षसंघटना अधिकाधिक मजबुत करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे असे पवार म्हणाले.

Web Title: ramesh pawar is now B.R.P bahujan mahasangh's general Secretary