रानबांबुळी-मुख्यालय रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करा - राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

सिंधुदुर्गनगरी - कसाल-मालवण मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रानबांबुळी फाटा ते जिल्हा मुख्यालय रस्ता नादुुरुस्त झाला आहे. वाहतुकीस धोकादायक बनला आहे. तरी या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती किंवा नूतनीकरणाबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना पत्राद्वारे केली आहे.

कसाल-मालवण या मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रानबांबुळी फाटा ते ओरोस फाटा हा रस्ता दुरुस्त झाल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन, जिल्हा रुग्णालय, जिल्हा मुख्यालय (शासकीय कार्यालये) असून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रहदारी आहे. या व्यतिरिक्त डॉन बॉस्को स्कूल, महाविद्यालयामध्ये जाणारे विद्यार्थी या मार्गावरून प्रवास करीत आहेत. मालवण तालुक्‍यातून कामानिमित्त येणारे सर्वच वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहन चालविताना खड्डे चुकविताना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी मालवण पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने जनतेची होणारी गैरसोय व अपघात टाळण्याच्या दृष्टीने गंभीर दखल घेत खासदार विनायक राऊत यांनी ओरोस फाटा ते रानबांबुळी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती किंवा नूतनीकरणाबाबत कार्यवाही करावी अशी सूचना लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे.

Web Title: ranbambuli road development