राणेंच्या पराभवासाठी उघड युती करू - प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कणकवली - नारायण राणेंच्या पराभव करण्यासाठी वेळ पडल्यास छुपी नव्हे, तर उघड युती करू. त्यासाठी प्रत्येक तालुकाध्यक्षांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली. भाजप-शिवसेनेची युती होऊ नये, यासाठी आमदार नीतेश राणे हे देव पाण्यात ठेवून बसले होते, असेही ते म्हणाले.

येथील भाजप कार्यालयात श्री. जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी प्रदेश चिटणीस राजन तेली, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक आप्पा लुडबे, भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष रवींद्र शेट्ये, राजन चिके, बाबा मोंडकर, विलास हडकर आदी उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, ‘‘केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. यामुळे जिल्ह्यात नारायण राणेंची काँग्रेस सत्तेवर येऊन काहीही उपयोग नाही. राणेंच्या साम्राज्याला सन २००९ च्या निवडणुकीत हादरा दिला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत राणेंची काँग्रेस पूर्णत: संपणार आहे. यासाठी आम्ही जिल्हा परिषदेत युतीसाठी आग्रही भूमिका घेतली होती.

शिवसेना हा आमचा शत्रू नाही तर मित्र पक्ष आहे. तसेच जिल्ह्यातील काँग्रेस पक्षालाही आम्ही फारसे विरोधक मानत नाही, तर राणेंची काँग्रेस आम्हाला नको आहेत. त्यामुळे मूळ काँग्रेसच्या मंडळींनीही भाजपला मतदान करावे. राणेंच्या पाडावासाठी जेथे जेथे तडजोड करणे शक्‍य होईल, तेथे युती करून निवडणूक लढविण्याला आमचे प्राधान्य आहे. त्याबाबतच्या समन्वयाचे अधिकार प्रत्येक तालुकाध्यक्षांना दिले आहेत. कुठला उमेदवार मागे घ्यायचा, हे तेच ठरविणार आहेत; मात्र जेथे निवडणूक येण्याची शक्‍यता असेल, तेथे आम्ही पूर्ण ताकद पणाला लावणार आहोत.

जिल्हा परिषदेच्या पन्नास आणि पंचायत समितीच्या शंभर जागांवर स्वबळावर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. यातील २७ उमेदवारांची यादी आज आम्ही निश्‍चित केली. उर्वरित उमेदवारांची यादी उद्या (ता. ३) जाहीर करणार आहे.’’ शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे आपसांत भांडणात वेळ ताकद खर्ची घालवू नये, असा प्रेमळ सल्ला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना दिला असल्याचेही ते म्हणाले.

नितेश राणे कंदील लावणार का?
भाजप जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर एक वर्षात काय केले? असा प्रश्‍न आमदार नीतेश राणे विचारत आहेत. आम्ही काय केले ते सिंधुदुर्गातील जनता बघून घेईल; पण राणे आमदार होऊन अडीच वर्षे झाली. या कालावधीत त्यांनी किती कंदील लावले? ते जाहीर करावे. नीतेश राणेंना राजकारणात आणल्याचा मोठा पश्‍चात्ताप माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना होतोय, अशीही टीका श्री. जठार यांनी केली.

सिंधुदुर्गातील जमिनींवर राणे कुटुंबीयांचाच डोळा
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे जमिनी घेत असल्याचा आरोप करणाऱ्या नीतेश राणेंनी याबाबतचे पुरावे द्यावेत, असे आव्हान श्री. जठार यांनी दिले. तसेच जमिनी घ्यायच्याच असतील तर त्यासाठी राणेंच्या परवानगीची गरज नाही. सिंधुदुर्गातील जमिनींवर राणे कुटुंबीयांचाच डोळा आहे, हे सर्व जिल्हावासीयांना माहीत आहे, असेही श्री. जठार म्हणाले.

Web Title: rane not be exposed to the Alliance defeat