राणे-रावल भेटीने चर्चेस उधाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

कणकवली - पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते नारायण राणेंची भेट घेतली. कणकवलीतील राणेंच्या "ओम गणेश' बंगल्यावर सुमारे पाऊण तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना रावल यांनी राणेंच्या भाजप प्रवेश चर्चेबाबत मौन बाळगले; मात्र लवकरच सिंधुदुर्ग भाजपमय होईल, असेही ते म्हणाले. 

पर्यटनमंत्र्यांचा आजचा दौरा खरे तर वैभववाडी, देवगड ते मालवण असा होता. वैभववाडीत उतरलेल्या पर्यटनमंत्र्यांनी कासार्डे येथे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे चहापान केले आणि त्यानंतर ते थेट नाश्‍त्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी रवाना झाले. सकाळी दहा वाजता ओम गणेश येथे दाखल झालेल्या पर्यटनमंत्र्यांचे स्वागत नारायण राणे यांनी केले. दरम्यान, पर्यटनमंत्री रावल आणि राणे यांनी बंद खोलीत सुमारे पाऊण तास चर्चा सुरू होती. 

राणेंच्या बंगल्यावरून बाहेर पडताना रावल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी राणे भाजप पक्षात येणार का, या प्रश्‍नाचे उत्तर देणे टाळले; मात्र देशात मोदींची लाट आहे. त्यामुळे सिंधुदुर्गदेखील लवकरच भाजपमय होईल, असे सूचक विधान त्यांनी केले. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा आहे. इथल्या पर्यटन विकासातही सी वर्ल्डच्या माध्यमातून क्रांती घडवून आणावयाची आहे, असे ते म्हणाले. 

Web Title: Rane-Raval meet