रांगोळी स्पर्धेत प्रवीण केळसकर प्रथम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

साडवली - देवरूख गुरू परिवाराचे गुरू प्रदीप बळिराम सावंत-भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगमेश्‍वर तालुका उत्कर्ष बहुविकलांग पुनर्वसन संस्थेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत सैतान है पाकिस्तान, उसको भारी पडेगा मेरा हिंदुस्थान या विषयावर रेखाटलेल्या दापोलीच्या प्रवीण केळसकर यांच्या रांगोळीला प्रथम क्रमांकाचे सात हजार ७७७ तसेच स्मृतिचिन्ह असे बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेत प्रवीण भोई यांना द्वितीय, तर देवरूखचे संदीप पवार यांना तृतीय पारितोषिक मिळाले. उत्तेजनार्थ म्हणून प्रशांत डिके, मंगेश नलावडे, अप्पा साळसकर, तेजस सदरेकर, विक्रांत मेस्त्री, विलास रहाटे यांना गौरवण्यात आले. विक्रांत भिसे (मुंबई) यांनी परीक्षण केले. माटे-भोजने सभागृहात बक्षीस समारंभ झाला. या वेळी एस. एन. जी. ग्रुपने बहारदार नृत्य सादर केले. मीनाक्षी ननवरे, महेश ननवरे, बंड्या अवसरे यांनी अभिनय, तर निनाद देसाई यांनी गायन केले. माजी सैनिक पुंडलिक पवार, बाळू घाणेकर, मनोज जोशी, डॉ. चंद्रकांत यलगुडकर, नेहा येलगुडकर, प्रमोद हर्डीकर, राजू काकडे हेल्प ॲकॅडमी यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रदीप बळिराम सावंत-भोसले, आनंद आंबेकर, सुनील गांधी, विलास मोरे, नगरसेविका सौ. निकिता रहाटे, संस्था सल्लागार युयुत्सु आर्ते, मोहन चाळके उपस्थित होते.

गुरू परिवार, जीवनदीप संस्थेतर्फे सहकार्य
गुरू परिवाराचे गुरू प्रदीप बळिराम सावंत-भोसले यांनी उत्कर्ष बहुविकलांग पुनर्वसन संस्थेसाठी कार्याध्यक्ष म्हणून विशेष लक्ष दिले आहे. भोसले यांच्या वाढदिनी तालुक्‍यात अपंग बांधवांना काठीचे वाटप तसेच व्हीलचेअर वाटप करण्यात आल्या. जीवनदीप जनहित संस्थेतर्फे डॉ. चंद्रकांत यलगुडकर यांनी आपल्याकडील रुग्णवाहिका संस्थेच्या ताब्यात दिली. या रुग्णवाहिकेचा लाभ अपंग बांधवांना होणार आहे. याबाबत संस्थाध्यक्ष विलास कदम यांनी भोसले व यलगुडकर यांचे आभार मानले.

Web Title: Rangoli competition Praveen kelasakar first

टॅग्स